 
						Adani Group Shares | अदानी समुहाच्या शेअर्समध्ये मागील दोन दिवसापासून मजबूत खरेदी पाहायला मिळत होती. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अदानी ग्रुपचा भाग असलेल्या अदानी पॉवर कंपनीचे शेअर्स 7.32 टक्क्यांच्या वाढीसह 326.90 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर अदानी एंटरप्रायझेस कंपनीचे शेअर्स 2.31 टक्क्यांच्या वाढीसह 2637 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
अदानी ग्रीन कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूकदारांनी भरघोस खरेदी केल्याने स्टॉक 2.63 टक्क्यांच्या वाढीसह 1020.90 रुपये किमतीवर पोहचला होता. आणि अदानी विल्मर कंपनीच्या शेअरमध्ये देखील भरघोस गुंतवणूक केल्याने शेअर 0.17 टक्क्यांच्या वाढीसह 382.60 रुपये किमतीवर पोहचला होता.
अदानी समूहाचा भाग असलेल्या आणि त्यांचा बंदर आणि सेझ व्यवसाय हाताळणाऱ्या अदानी पोर्ट कंपनीच्या शेअरची 2.59 टक्क्यांनी वाढून 857.55 रुपये किमतीवर क्लोज झाली होती. अदानी टोटल गॅस कंपनीचे शेअर्स 1.57 टक्क्यांच्या वाढीसह 664.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. अदानी एनर्जी सोल्युशन्स कंपनीचे शेअर्स देखील 5.84 टक्क्यांच्या वाढीसह 922.80 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
एनडीटीव्ही कंपनीचे शेअर्स 1.38 टक्क्यांच्या वाढीसह 227.50 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आणि अंबुजा सिमेंट कंपनीचे शेअर्स सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 3.09 टक्के वाढीसह आणि ACC कंपनीचे शेअर्स 2.22 टक्के वाढीसह क्लोज झाले होते.
स्टॉक वाढीचे कारण काय?
अमेरिकेतील गुंतवणूक कंपनी GQG पार्टनर्सने अदानी समुहाच्या काही कंपन्यांमध्ये गुंतवणुक करायला सुरुवात केली आहे. आता या कंपनीने अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन या कंपनीमध्ये अधिक गुंतवणूक करून आपले भाग भांडवल पाच टक्क्यांपेक्षा जास्त वाढवले आहे.
दुसरीकडे अदानी समूहाचा भाग असलेली अदानी इलेक्ट्रिसिटी कंपनी मुंबईतील आपले नेटवर्क मजबूत करण्यासाठी मुंबई शहरात आणखी दोन ट्रान्समिशन लाइन्सचे जाळे टाकत आहे. यासाठी कंपनी 2,000 कोटी रुपये गुंतवणूक देखील करणार आहे. मागील आठवड्यात अदानी ट्रान्समिशन कंपनीने आंतरराष्ट्रीय कर्जदात्याकडून 1,700 कोटी रुपये कर्ज उभारणी केली आहे.
गुंतवणुकीचे आगमन :
औद्योगिक क्षेत्राचे माहेरघर असलेल्या युरोप आणि मध्य पूर्व तसेच आफ्रिकेतील सर्वात मोठ्या एकात्मिक युटिलिटीज कंपनीपैकी एक असलेल्या अबू धाबी सिक्युरिटीज एक्स्चेंजमध्ये सूचीबद्ध असलेली दुसरी सर्वात मोठी कंपनी TAQA अदानी समूहात 1.5-2.5 अब्ज डॉलर्स गुंतवणूक करणार आहे. TAQA ने अदानी समूहाच्या विविध कंपन्यांमध्ये 1.5-2.5 अब्ज डॉलर्स गुंतवणूक करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
अदानी समूहाच्या मुंद्रा सोलर एनर्जी कंपनीला गुजरातमधील मुंद्रा येथील सौर फोटोव्होल्टेइक उत्पादन प्रकल्पासाठी भारतीय सोलर एनर्जी कॉर्पोरेशनने मंजुरी दिली आहे. या केंद्राची एकूण वीज निर्मिती क्षमता वार्षिक 2.0 GW असेल.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		