Adani Group Shares | अदानी समूहातील शेअर्समध्ये अप्रतिम सुधारणा होतेय, या बातमीने अदानी शेअर्स अजून तेजीत येणार? डिटेल्स पाहा

Adani Group Shares | अदानी समूहाच्या गुंतवणूकदारांसाठी खुश खबर आहे. सेबीने अदानी समूहाचा भाग असेल्ल्या चार कंपन्यांच्या शेअर्सची अप्पर सर्किट मर्यादा वाढवली आहे. यामध्ये अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड, अदानी ट्रान्समिशन लिमिटेड, अदानी विल्मार लिमिटेड, आणि अदानी पॉवर हे स्टॉक सामील आहेत.
सेबीने या कंपन्याच्या शेअरची अप्पर सर्किट मर्यादा 5 टक्के वरून वाढवून 10 टक्के केली आहे. तर अदानी पॉवर स्टॉकची अप्पर सर्किट मर्यादा 5 टक्के वरून वाढवून 20 टक्के केली आहे. अप्पर सर्किट लिमिट वाढवण्यामुळे सर्वात जास्त फायदा अदानी पॉवर स्टॉकला झाला आहे. आज गुरूवार दिनांक 8 जून 2023 रोजी अदानी पॉवर कंपनीचे शेअर्स 279.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अदानी विल्मर आणि अदानी ट्रान्समिशन कंपनीचे शेअर्स अनुक्रमे 0.61 टक्के घसरणीसह आणि 1.4 टक्के घसरणीसह 429.6 रुपये आणि 816.2 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. अदानी ग्रीन एनर्जी कंपनीचे शेअर्स 0.5 टक्के वाढीसह 992.85 रुपये आणि अदानी पॉवर कंपनीचे शेअर 1.4 टक्के वाढीसह 263 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
मागील आठवड्यात सेबीने अल्पकालीन ASM फ्रेमवर्कमधून अदानी एंटरप्रायझेस कंपनीचे शेअर्स वगळले आहेत. 24 मे 2023 रोजी सेबीने अदानी एंटरप्रायझेस स्टॉकला अल्पकालीन अतिरिक्त पर्यवेक्षी उपाय फ्रेमवर्क अंतर्गत ठेवले होते.
अमेरिका स्थित हिंडेनबर्ग रिसर्च फर्मने 24 जानेवारी 2023 रोजी प्रसिद्ध अहवालात अदानी समूहाच्या कंपन्या विरुद्ध फसवणूक आणि स्टॉकमध्ये गैरप्रकार केल्याचा आरोप केला होता. अदानी समूहाने यासंबधीत सर्व आरोप फेटाळले होते. आणि सुप्रीम कोर्टाने नियुक्त केलेल्या पॅनेलला देखील असनी समुहाच्या कंपन्यांमध्ये कोणताही गैरप्रकार सापडला नाही.
अदानी समूहाने यूएस शॉर्ट सेलर फर्मच्या खोट्या अहवालानंतर गुंतवणूकदारांचा विश्वास परत मिळवण्यासाठी प्रीपेमेंट शेड्यूल पूर्ण करण्यासाठी त्यांनी एकूण 2.65 अब्ज डॉलर्स कर्ज परतफेड केले आहे. अदानी समूहाने दिलेल्या माहिती म्हंटले आहे की, त्यांनी 2.15 अब्ज डॉलर्सचे कर्ज परतफेड केले आहे. हे कर्ज अदानी समूहाने आपल्या सूचीबद्ध कंपन्यांमधील शेअर्स गहाण ठेवून घेतले होते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | Adani Group Shares today on 08 June 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचा शेअर देईल 39 टक्के परतावा, ही अपडेट जाणून घ्या - NSE: ADANIPOWER
-
NTPC Green Energy Share Price | 107 रुपयांचा शेअर 150 रुपये टार्गेट प्राईस गाठणार; अशी संधी सोडू नका - NSE: NTPCGREEN
-
Suzlon Share Price | तब्बल 2391 टक्के परतावा देणारा शेअर पुन्हा मालामाल करणार; फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर प्राईसची दिशा ठरली, बिनधास्त खरेदी करावा असा शेअर - NSE: BEL
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN
-
IRFC Share Price | मल्टिबॅगर रेल्वे स्टॉक मालामाल करणार, शॉर्ट टर्म अपसाईड टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC