Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर्सबाबत फायद्याची अपडेट, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, मजबूत कमाईची संधी

Adani Port Share Price | अनेक ब्रोकरेज हाऊसेसने अदानी पोर्ट्स कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. या कंपनीचे शेअर्स शुक्रवारी हिरव्या निशाणीवर क्लोज झाले होते. मागील काही दिवसांपासून अदानी पोर्ट्स कंपनीचे शेअर्स चर्चेत आले आहे. ( अदानी पोर्ट्स कंपनी अंश )

ब्रोकरेज फर्म कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीजने शेअर बाजाराची कामगिरी कमकुवत राहण्याचा अंदाज व्यक्त केला होता. मात्र अदानी पोर्ट्स कंपनीच्या शेअरमधील तेजीत कोणताही बदल झाला नाही. शुक्रवार दिनांक 14 जून 2024 रोजी अदानी पोर्ट्स स्टॉक 1.80 टक्के वाढीसह 1,429.70 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.

कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीज फर्मने अदानी पोर्ट स्टॉकवर 1,650 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. कोटक फर्मने आपल्या अहवालात म्हंटले आहे की, त्यांनी हायर इस्टिमेट आणि हायर रि-इनवेस्टमेंट व्हॅल्यूमुळे अदानी पोर्ट्स कंपनीच्या शेअरची टारगेट प्राइस वाढवली आहे. एप्रिल-मे 2024 या काळात अदानी पोर्ट्स कंपनीने आपल्या वॉल्यूममध्ये YoY आधारे 14 टक्के वाढ नोंदवली आहे. यामधे गंगावरम पोर्टचे 6 दशलक्ष टन ऑफसेट मूल्यांकन देखील सामील आहे.

अदानी पोर्ट्स कंपनीकडे आपली सध्याची क्षमता 5-6 पटीने वाढण्याची ताकद आहे. यामुळे कंपनीला खूप मोठा फायदा होऊ शकतो. कारण अदानी पोर्ट्स कंपनीच्या बहुतेक प्रतिस्पर्ध्यांना त्यांची विद्यमान क्षमता 2X ने वाढवणे देखील कठीण आहे. अदानी पोर्ट्स कंपनीने मागील एका दशकात धामरा, कट्टुपल्ली, कृष्णपट्टणम, गंगावरम आणि सुरगुजा रेल्वेमध्ये देखील गुंतवणूक केली आहे. अदानी पोर्ट्स कंपनीचा एकूण EBITDA 5,000 कोटी रुपये आहे, जे कंपनीच्या एकूण नेट लोनच्या समान आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Adani Port Share Price NSE Live 17 June 2024.