 
						Adani Port Share Price| अदानी समूहाचा भाग असलेल्या अदानी पोर्ट्स कंपनीचे शेअर्स सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 1345 रुपये किमतीवर ओपन झाले होते. त्यानंतर हा स्टॉक 1356.50 रुपये किमतीवर पोहोचला होता. आज मात्र या कंपनीच्या शेअर्समध्ये किंचित नफा वसुली पाहायला मिळत आहे. फेब्रुवारी महिन्यात वार्षिक आधारावर मालवाहतुकीत 33 टक्क्यांची नोंदवली गेली आहे. ( अदानी पोर्ट्स कंपनी अंश )
फेब्रुवारी 2024 मध्ये अदानी पोर्ट्स कंपनीने एकूण 35.4 एमएमटी कार्गो हाताळला आहे. मागील वर्षीच्या फेब्रुवारीच्या तुलनेत हे प्रमाण 33 टक्के अधिक आहे. आज मंगळवार दिनांक 5 मार्च 2024 रोजी अदानी पोर्ट्स स्टॉक 0.22 टक्के घसरणीसह 1,339.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
चालू आर्थिक वर्षाच्या मागील 11 महिन्यांच्या काळात अदानी पोर्ट्स कंपनीने 382 MMT कार्गो हाताळले आहेत. अशा परिस्थितीत कंपनी लवकरच 400 एमएमटीचा आकडा स्पर्श करेल, अशी अपेक्षा आहे. अदानी पोर्ट्स कंपनीने आतापर्यंत मालवाहू व्यवस्था हाताळण्याच्या बाबतीत वार्षिक आधारावर 21 टक्के वाढ नोंदवली आहे. ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवालच्या तज्ञांच्या मते, अदानी पोर्ट्स कंपनीचे शेअर्स पुढील काळात 1410 रुपये किंमत स्पर्श करू शकतात.
मागील 6 महिन्यांत अदानी पोर्ट्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 70 टक्के परतावा कमवून दिला आहे. याकाळात कालावधीत बेंचमार्क निफ्टी-50 निर्देशांकामध्ये फक्त 14 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. मागील एका वर्षात अदानी पोर्ट्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 94 टक्के परतावा कमवून दिला आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 571.35 रुपये होती.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		