1 May 2025 12:37 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HUDCO Share Price | झटपट मालामाल करणार हा शेअर, फायद्याची अपडेट आली, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO RVNL Share Price | पीएसयू शेअर पुन्हा सुसाट तेजीने परतावा देणार, शॉर्ट टर्म टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL IREDA Share Price | मल्टिबॅगर शेअर मालामाल करणार, स्वस्तात खरेदी करा, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: IREDA GTL Infra Share Price | पेनी स्टॉक 52-वीक लो लेव्हलच्या जवळ; स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: GTLINFRA Horoscope Today | 01 मे 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 01 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Share Price | जेएम फायनान्शियल फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्स टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RELIANCE
x

Adani Ports Share Price | मल्टिबॅगर अदानी पोर्ट्स शेअरवर 250 टक्के डिव्हीडंड जाहीर, शेअर खरेदीसाठी ऑनलाईन गर्दी

Highlights:

  • Adani Ports Share Price
  • अदानी पोर्ट्स शेअरची सध्याची किंमत
  • 250 टक्के लाभांशची घोषणा
Adani Ports Share Price

Adani Ports Share Price | गौतम अदानी समूहाचा भाग असलेल्या अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन कंपनीने मार्च 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. या तिमाहीत कंपनीने 1,158.88 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील वर्षीच्या याच तिमाहीत कंपनीने 1,102.61 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.

मागील तिमाहीच्या तुलनेत या तिमाहीत कंपनीने 5.1 टक्के अधिक नफा कमावला आहे. या तिमाहीत कंपनीच्या महसुलात देखील 40 टक्के वाढ झाली असून कंपनीने 5797 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे.

याशिवाय अदानी समूहाच्या अदानी पोर्ट्स आणि शिपिंग फ्लॅगशिप फर्मच्या EBITDA मध्ये 59 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. या कंपनीचा EBITDA 3270 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. एका वर्षापूर्वी याच तिमाहीत कंपनीचा EBITDA 2057 कोटी रुपये होता.

अदानी पोर्ट्स शेअरची सध्याची किंमत

अदानी पोर्ट्स कंपनीचे मार्जिन देखील आर्थिक वर्ष 2022-23 च्या चौथ्या तिमाहीत 56.4 टक्के वाढले आहेत. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीचे मार्जिन 49.7 टक्के होते. आज बुधवार दिनांक 31 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.81 टक्के वाढीसह 740.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

250 टक्के लाभांशची घोषणा

अदानी पोर्ट्स कंपनीच्या संचालक मंडळाने आपल्या शेअर धारकांना प्रति शेअर 5 रुपये लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. दर्शनी मूल्यावर आधारित कंपनी 250 टक्के लाभांश वाटप करणार आहे. यासाठी आगामी वार्षिक सर्वसाधारण सभेत कंपनी शेअर धारकांची मान्यता घेईल. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अदानी पोर्ट्स कंपनीचे शेअर्स 1 टक्क्यांच्या घसरणीसह 734.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Adani Ports Share Price today on 31 May 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Adani Ports Share Price(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या