
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचे शेअर्स गुरुवारी 652 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मात्र या स्टॉकमध्ये जोरदार पडझड पाहायला मिळत आहे. भारतात उन्हाळी हंगामात विजेची मागणी वाढते, याचा फायदा टाटा पॉवर, अदानी पॉवर यासारख्या वीज कंपन्यांना होतो. मात्र मागील काही दिवसापासून शेअर बाजारात अस्थिरता असल्याने सर्व स्टॉक विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहेत. ( अदानी पॉवर कंपनी अंश )
मागील एका वर्षात अदानी पॉवर कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 171 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज शुक्रवार दिनांक 17 मे 2024 रोजी अदानी पॉवर स्टॉक 0.52 टक्के घसरणीसह 637 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, या स्टॉकमध्ये अजून वाढ होण्यास वाव आहे. 16 मे रोजी अदानी पॉवर स्टॉक 1 टक्के वाढीसह 652 रुपये या आपल्या नवीन सार्वकालीन उच्चांक किमतीवर पोहचला होता. आज मात्र शेअरमध्ये किंचित घसरण पहायला मिळत आहे. शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, अदानी पॉवर स्टॉक 647 रुपये किमतीवर ब्रेकआऊट देत आहे. जर या स्टॉकने मजबूत व्हॉल्युमसह ब्रेकआउट तोडला, तर शेअर अल्पावधीत 695-710 रुपयेवर जाऊ शकतो, असा विश्वास तज्ञांनी व्यक्त केला आहे.
रेलिगेअर ब्रोकिंग फर्मच्या तज्ञांच्या मते, अदानी पॉवर स्टॉक पुढील काळात मजबूत कमाई करून देऊ शकतो. यासाठी तज्ञांनी गुंतवणुकदारांना पैसे लावताना 620 रुपये किमतीवर स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, तेजीच्या काळात हा स्टॉक 680-685 रुपये किंमत स्पर्श करू शकतो. मार्च 2024 तिमाहीत कच्च्या मालाच्या खर्चात घट झाल्यामुळे आणि वाढीव वीज निर्मिती क्षमतेमुळे अदानी पॉवर कंपनीच्या उत्पन्नात मजबूत वाढ होण्याची अपेक्षा आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.