
Adani Power Share Price | मागील वर्षाच्या सुरुवातीला अमेरिकन फर्म हिंडनबर्गने एक वादग्रस्त अहवाल जाहीर केला होता. त्यात अदानी समूहावर अनेक गंभीर आरोप करण्यात आले होते. त्यामुळे अदानी समूहातील जवळपास सर्व कंपन्यांचे शेअर्स अक्षरशः कोसळले होते. अदानी पॉवर कंपनीचा शेअर देखील घसरणीमुळे 132.40 रुपये किमतीवर आला होता. आज शुक्रवार दिनांक 23 फेब्रुवारी 2024 रोजी अदानी पॉवर स्टॉक 0.56 टक्के घसरणीसह 559.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
मागील वर्षीच्या 132 रुपये या नीचांक किंमत पातळीवरून अदानी पॉवर कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 4 पट अधिक परतावा कमावून दिला आहे. YTD आधारे या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 240 टक्के परतावा कमावून दिला आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अदानी पॉवर कंपनीचे शेअर्स 546.50 रुपये किमतीवर ओपन झाले होते. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 589.45 रुपये होती.
मागील सहा महिन्यांत अदानी पॉवर कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 58 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. 2024 या नवीन वर्षात अदानी पॉवर स्टॉक 5.42 टक्के मजबूत झाला आहे. मागील तीन महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 42 टक्के परतावा कमावून दिला आहे.
मागील 5 वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 1284 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील तीन वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 890 टक्के पेक्षा जास्त नफा कमावून दिला आहे. टेक्निकल ट्रेंडबद्दल बोलायचे झाल्यास, अदानी पॉवर स्टॉक दीर्घकालीन तेजीचे संकेत देत आहे.
अदानी पॉवर स्टॉकने 30 दिवसांच्या SMA, 200 दिवसांच्या SMA ला ओलांडले आहे. अदानी पॉवर स्टॉक आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवरून चांगल्या व्हॉल्यूमसह 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीजवळ पोहचला आहे. अदानी पॉवर कंपनीचे मजबूत बाजार भांडवल आणि कमी पब्लिक होल्डिंग ही कंपनीसाठी सकारात्मक बाब आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.