
Adani Power Share Price | सुप्रीम कोर्टाने स्थापन केलेल्या पॅनेलकडून अदानी समुहाला क्लीन चिट मिळताच अदानी ग्रुपचे सर्व शेअर्स तेजीत आले. या दरम्यान अदानी पॉवर कंपनीचे शेअर्स आज 5 टक्के अप्पर सर्किटमध्ये अडकले होते. स्टॉक मधील तेजी पाहून शेअर बाजारातील तज्ञांनी अदानी पॉवर स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. आज मंगळवार दिनांक 23 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.98 टक्के वाढीसह 260.25 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
अदानी पॉवर स्टॉक टार्गेट प्राईस :
आयआयएफएल सिक्युरिटीज फर्मच्या तज्ञांनी अदानी पॉवर कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. पुढील काही दिवसात या कंपनीचे शेअर्स 275 ते 300 रुपयेपर्यंत वाढू शकतात, असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. या कंपनीच्या शेअरला 220 रुपये किमतीवर मजबूत आधार मिळण्याची अपेक्षा आहे.
52 आठवड्यांची पातळी
22 ऑगस्ट 2022 रोजी अदानी पॉवर कंपनीच्या शेअरने 432.80 रुपये ही आपली उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली होती. 28 फेब्रुवारी 2023 रोजी अदानी पॉवर कंपनीच्या शेअरने 132.55 रुपये ही आपली 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी स्पर्श केली होती.
मागील 3 महिन्यांत 53 टक्के परतावा दिला
अदानी पॉवर कंपनीच्या शेअर मागील तीन महिन्यांत आपल्या गुंतवणुकदारांना 53 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 25 टक्के परतावा कमावून दिला आहे. तथापि, अदानी पॉवर कंपनीच्या शेअरने एक वर्ष आणि सहा महिन्यांच्या कालावधीत सेन्सेक्सच्या तुलनेत नकारात्मक वाढ नोंदवली आहे.
मागील 3 वर्षांत 655 टक्के परतावा दिला
मागील तीन वर्षांच्या कालावधीत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 655 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील 5 वर्षांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 1130 टक्के परतावा कमावून दिला आहे.
मार्च तिमाहीची आर्थिक कामगिरी
अदानी पॉवर कंपनीने मार्च तिमाहीत 13 टक्के वाढीसह 5,242 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीने 4,645 कोटी रुपये नफा कमावला होता. तर मार्च तिमाहीत कंपनीचे एकूण उत्पन्न वार्षिक 13,307 कोटी रुपयांवरून कमी होऊन 10,795 कोटी रुपयेवर आले आहे. कंपनीचा एकूण खर्च वार्षिक आधारावर 7,174 कोटी रुपयांवरून वाढून 9,897 कोटी रुपयेवर पोहचला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.