
Adani Power Share Price | मागील काही वर्षात भारतात विजेची मागणी प्रचंड प्रमाणात वाढली आहे. याशिवाय औष्णिक वीज केंद्रांना इंधन पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी भारत सरकारने सरकारी विभाग आणि खाजगी कंपन्यांना सूचना दिल्या आहेत. सध्या अदानी पॉवर कंपनी विजेच्या दीर्घकालीन मागणीचा फायदा घेण्यासाठी मजबूत स्थितीत आहे. ( अदानी पॉवर कंपनी अंश )
याशिवाय अदानी पॉवर कंपनी व्यवसाय वाढीच्या धोरणामध्ये ब्राउनफील्ड विस्तार, अल्ट्रा सुपरक्रिटिकल तंत्रज्ञानाचा अवलंब आणि ऑरगॅनिक व्यवसाय वाढीच्या संधींचे मूल्यांकन या सर्व बाबी सामील आहेत. शुक्रवार दिनांक 3 मे 2024 रोजी अदानी पॉवर स्टॉक 0.76 टक्के घसरणींसह 603.50 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
भारतात उन्हाळ्यात विजेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. सध्या हे प्रमाण 260 गिगावॅट आहे. जी पूर्वीच्या अंदाजापेक्षा खूप जास्त आहे. यासह विजेची मागणी पूर्ण करण्यासाठी भारतात थर्मल पॉवर प्लांट देखील खूप महत्वाचे आहे. हे लक्षात घेऊन भारत सरकारने औष्णिक ऊर्जा केंद्रांना लागणारा पुरेसा इंधन पुरवठा सुनिश्चित करण्याच्या सूचना केल्या आहेत. अदानी पॉवर कंपनीने थर्मल पॉवर इंस्टॉलेशन्समधील वीज निर्मिती वाढीचा अंदाज 50GW वरून 80 GW पर्यंत वाढवला आहे. कंपनीचे म्हणणे आहे की त्यांना वीज निर्मिती क्षमता 24 GW पेक्षा जास्त वाढवायची आहे.
अनेक वीज वितरण कंपन्या औष्णिक ऊर्जा प्रकल्पांसाठी लिलाव करण्याचे संकेत देत आहेत, त्यामुळे अदानी पॉवर कंपनीने ब्राउनफिल्ड विस्ताराची योजना आखली आहे. कंपनीची वीज उत्पादन कार्यक्षमता सुधारण्यासाठी आणि उत्सर्जन कमी करण्यासाठी अल्ट्रा-सुपरक्रिटिकल तंत्रज्ञानाचा वापर करणार आहे. सध्या अदानी पॉवर कंपनीने व्यवसाय विस्तार योजनांसह महान वीज निर्मिती प्लांटमध्ये 1600 मेगावॅट क्षमता अपग्रेड करून त्याठिकाणी रिंगर पॉवर प्लांट विकसित केला आहे.
अदानी पॉवर कंपनीने मागील वर्षी मार्च तिमाहीत 10,242.06 कोटी रुपये महसूल संकलित केला होता, जो आता 30 टक्क्यांनी वाढून 13,363.69 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. मार्च 2024 तिमाहीत अदानी पॉवर कंपनीचा निव्वळ नफा 48 टक्क्यांच्या वाढीसह 2737 कोटी रुपये नोंदवला गेला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.