Adani Total Gas Share Price | अदानी टोटल गॅस शेअर तेजीचे संकेत, फायद्याची अपडेट येताच स्टॉक खरेदी वाढली
Adani Total Gas Share Price | अदानी टोटल गॅस कंपनीचे शेअर्स मजबूत तेजीत वाढत आहेत. नुकताच या कंपनीने आपले जून तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. जून 2024 तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा 20 टक्क्यांच्या वाढीसह 177 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. कंपनीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, जून तिमाहीत कंपनीच्या सीएनजी आणि पाइप्ड कुकिंग गॅसच्या विक्रीत वाढ झाल्याने कंपनीचा नफा वाढला आहे.
मागील वर्षी याच तिमाहीत अदानी टोटल गॅस कंपनीचा नफा 148 कोटी रुपये नोंदवला गेला होता. आज मंगळवार दिनांक 30 जुलै 2024 रोजी अदानी टोटल गॅस स्टॉक 0.51 टक्के वाढीसह 897.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
जून तिमाहीत अदानी टोटल गॅस कंपनीचे परिचलन उत्पन्न नऊ टक्क्यांच्या वाढीसह 1,237 कोटी नोंदवले गेले आहे. याच तिमाहीत कंपनीचा EBITDA वार्षिक आधारावर 21 टक्क्यांच्या वाढीसह 308 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. आर्थिक वर्ष 2024-25 च्या जून तिमाहीत अदानी टोटल गॅस कंपनीची सीएनजी विक्री 20 टक्क्यांच्या वाढीसह 153 दशलक्ष घनमीटर नोंदवली गेली आहे.
कंपनीची PNG विक्री 11 टक्क्यांच्या वाढीसह 77 दशलक्ष घनमीटर नोंदवली गेली आहे. अदानी टोटल गॅस लिमिटेड कंपनीचे सीईओ सुरेश पी मंगलानी यांनी आपल्या निवेदनात म्हंटले आहे की, कंपनीने 2024-25 या आर्थिक वर्षाची चांगली सुरुवात केली आहे. अदानी टोटल गॅस कंपनीने 17 टक्के व्हॉल्यूम वाढीसह 21 टक्के EBITDA वाढ नोंदवली आहे.
सोमवारी अदानी टोटल गॅस कंपनीचे शेअर्स 4 टक्के वाढीसह 924 रुपये किमतीवर पोहचले होते. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 34 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील पाच वर्षात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 147 टक्के वाढली आहे. 2024 या वर्षात अदानी टोटल गॅस स्टॉक 10 टक्के वाढला आहे.
मागील सहा महिन्यांत अदानी टोटल गॅस कंपनीच्या शेअरची किंमत 13 टक्के वाढली आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 1,259.90 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 521.95 रुपये होती. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 98,185.55 कोटी रुपये आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Adani Total Gas Share Price NSE Live 30 July 2024.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजी बाबत महत्वाचा रिपोर्ट, शेअर प्राईसवर काय परिमाण होणार? डिटेल्स नोट करा
- Mazagon Dock Share Price | 3 वर्षांत दिला 18 पट परतावा, आता तज्ज्ञांचा इशारा, स्टॉक 'BUY' करावा की Sell?
- Face Pack | जराही वेदना न होता चेहेऱ्यावरील बारीक केस होतील गायब; घरच्याघरी ट्राय करा हा खास फेसपॅक
- Business Idea | गाव-खेड्यातील महिलांनी सुरु केला शेणापासून सुगंधीत धूप निर्मित उद्योग, लाखोत होतेय कमाई
- Relationship Tips | चांगल्या लाईफ पार्टनरमध्ये 'हे' गुण असेलच पाहिजेत; संसार सोन्याहून सुंदर होतो
- Stree 2 Movie | स्त्री टू चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई; शाहरुखच्या डंकी चित्रपटाचा देखील मोडला रेकॉर्ड
- Toner for Face | साऊथ कोरियाच्या मुलींसारखी पांढरी शुभ्र त्वचा हवी? तज्ञांच्या सल्ल्याप्रमाणे या ट्रिक्स फॉलो करा
- Smart Investment | तुमच्या पत्नीला महिना 44,793 रुपये पेन्शन मिळेल, प्लस 1 कोटी 12 लाख रुपये परतावा मिळेल
- Apollo Micro Systems Share Price | पैसाच पैसा देणारा शेअर! 3 वर्षात दिला 825% परतावा, आता फायद्याची अपडेट आली
- Urfi Javed | 3 वर्षात मी कोणाला किस सुद्धा केलं नाही...; उर्फीने स्वतःच्या खाजगी आयुष्याबद्दल काय खुलासा केला?