
Advik Capital Share Price | ॲडविक कॅपिटल कंपनीच्या पेनी स्टॉकमध्ये जबरदस्त विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बीएसई सेन्सेक्स आणि एनएससी निफ्टी निर्देशांक सुरुवातीला तेजीत ओपन झाले होते. मात्र नंतर निफ्टी निर्देशांक 52 अंकांच्या वाढीसह 21778 अंकांच्या पातळीवर आला, आणि सेन्सेक्स 212 अंकांच्या वाढीसह 71964 अंकांवर आला होता.
याच ट्रेडिंग सेशनमध्ये ॲडविक कॅपिटल कंपनीचे शेअर्स 4.7 टक्क्यांच्या घसरणीसह 3.79 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ॲडविक कॅपिटल कंपनीचे एकूण बाजार भांडवल 162 कोटी रुपये आहे. आज शुक्रवार दिनांक 2 फेब्रुवारी 2024 रोजी ॲडविक कॅपिटल स्टॉक 4.75 टक्के घसरणीसह 3.61 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
ॲडविक कॅपिटल कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 5.01 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 1.90 रुपये होती. या कंपनीने नुकताच आपले डिसेंबर तिमाहीचे निकाल जाहीर केले आहे. चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत ॲडविक कॅपिटल कंपनीने 5.089 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. तर सप्टेंबर 2023 च्या तिमाहीत कंपनीने 1.379 कोटी महसूल संकलित केला होता.
मागील आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत ॲडविक कॅपिटल कंपनीने 1.082 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. डिसेंबर 2023 तिमाहीत ॲडविक कॅपिटल कंपनीने 2.26 कोटी रुपये करपूर्व नफा नोंदवला आहे. तर सप्टेंबर तिमाहीत कंपनीने 1.55 कोटी रुपये करपुर्व नफा कमावला होता. मागील आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत कंपनीचा PBT 5.02 कोटी रुपये नोंदवला गेला होता.
मागील 2 वर्षांत ॲडविक कॅपिटल कंपनीच्या शेअर्सची किंमत 29 पैशांवरून वाढून 5 रुपये किमतीपर्यंत पोहोचली होती. मागील 2 वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 1350 टक्के परतावा कमावून दिला आहे. जर एखाद्या गुंतवणूकदारांनी 2 वर्षांपूर्वी ॲडविक कॅपिटल कंपनीच्या शेअर्समध्ये 100,000 रुपये लावले असते तर आज त्याच्या गुंतवणुकीचे मूल्य 15 लाख रुपये झाले असते.
ॲडविक कॅपिटल ही एक नॉन-बँकिंग वित्तीय कंपनी म्हणून व्यवसाय करते. ही कंपनी आपल्या ग्राहकांना आवश्यक भाडेपट्टी, वित्त, गुंतवणूक आणि इतर कॉर्पोरेट भाडेपट्टीवर सल्ला देण्याचा काम करते. या कंपनीचा ग्राहकवर्ग केवळ भारतातच नाही तर जगभरात पसरला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.