
Aegis Logistics Share Price | एजिस लॉजिस्टिक या गॅस, ऑइल आणि केमिकल लॉजिस्टिक सेवा प्रदान करणाऱ्या कंपनीच्या शेअर्सने मागील 10 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर प्रॉफिट कमावून दिला आहे. मागील 10 वर्षात एजिस लॉजिस्टिक कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 3000 टक्के परतावा कमावून दिला आहे.
जर तुम्ही 10 वर्षांपूर्वी एजिस लॉजिस्टिक कंपनीच्या शेअर्समध्ये 10,000 रुपये लावले असते, तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 3 लाख रुपये झाले असते. आज सोमवार दिनांक 26 फेब्रुवारी 2024 रोजी एजिस लॉजिस्टिक स्टॉक 2.87 टक्के घसरणीसह 431.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
मागील 6 महिन्यांत एजिस लॉजिस्टिक कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 18 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील 1 महिन्यात या कंपनीच्या स्टॉकची किंमत तब्बल 15 टक्के वाढली आहे. शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स पुढील काळात मजबूत कामगिरी करू शकतात.
एजिस लॉजिस्टिक कंपनीच्या शेअर्समध्ये 429 रुपये आणि 405 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट पाहायला मिळत आहे. म्हणून तज्ञांनी गुंतवणूक करताना 404 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. पुढील काळात या कंपनीचे शेअर्स 471 रुपये ते 500 रुपये किंमत स्पर्श करू शकतात.
नुकताच एजिस लॉजिस्टिक कंपनीने आपले डिसेंबर 2023 तिमाहीचे निकाल जाहीर केले होते. डिसेंबर 2023 तिमाहीत कंपनीने 1873 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. या तिमाहीत एजिस लॉजिस्टिक कंपनीचा PAT मागील वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत 7 टक्क्यांनी वाढून 52 कोटी रुपये नोंदवला गेला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.