
Ajmera Realty Share Price | अजमेरा रियल्टी अँड इन्फ्रा इंडिया लिमिटेड या रिअल इस्टेट कंपनीने 2023-24 या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत सेल्समध्ये 52 टक्के वाढ साध्य केली आहे. घरांच्या मजबूत मागणीमुळे कंपनीची सेल्स 252 कोटी रुपयेवर पोहोचली आहे.
मागील वर्षी याच तिमाही कालावधीत कंपनीने 166 कोटी रुपयेची सेल्स साध्य केली होती. आज बुधवार दिनांक 11 ऑक्टोबर 2023 रोजी अजमेरा रियल्टी अँड इन्फ्रा इंडिया लिमिटेड कंपनीचे शेअर्स 0.99 टक्के वाढीसह 427.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
अजमेरा रियल्टी अँड इन्फ्रा इंडिया लिमिटेड कंपनीच्या सेल्समध्ये वाढ झाल्याची बातमी आल्यानंतर गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात स्टॉक खरेदी करायला सुरुवात केली. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 18 टक्क्यांच्या वाढीसह 373 रुपये किमतीवर ओपन झाले होते. मात्र काही वेळात हा स्टॉक 440.05 रुपये किमतीवर पोहोचला होता.
अजमेरा रियल्टी अँड इन्फ्रा इंडिया लिमिटेड कंपनीने स्टॉक एक्स्चेंज फाइलिंगमध्ये माहिती दिली आहे की, कंपनीची सेल्स वार्षिक आधारावर 51 टक्क्यांच्या वाढीसह 1,20,787 स्क्वेअर फूट नोंदवली गेली आहे. मागील वर्षी याच तिमाही कालावधीत कंपनीची एकूण सेल्स 79,976 स्क्वेअर फूट नोंदवली गेली होती.
कंपनीच्या संचालकांनी आपल्या निवेदनात जाहीर केले की, “आर्थिक वर्ष 2023-24 च्या दुसऱ्या तिमाहीत कंपनीची उच्च विक्री आणि व्यावसायिक क्रियाकलापांसह, 2023-24 या चालू आर्थिक वर्षात कंपनीचे सेल्स प्रमाण 1,000 कोटी रुपये या कंपनीच्या विक्री लक्षाच्या जवळ आले आहे”.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.