
Alkyl Amines Chemicals Share Price | ‘अल्काइल अमाइन्स केमिकल्स’ या खास केमिकल कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. ‘अल्काइल अमाइन्स केमिकल्स’ कंपनीच्या शेअरने मागील 5 ते 10 वर्षांच्या कालावधीत आपल्या गुंतवणूकदारांना 8500 टक्के नफा कमावून दिला आहे. आज शुक्रवार दिनांक 19 मे 2023 रोजी ‘अल्काइल अमाइन्स केमिकल्स’ कंपनीचे शेअर्स 0.024 टक्के घसरणीसह 2,539.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
1 लाखावर 13 कोटी परतावा :
जर तुम्ही 16 वर्षापूर्वी ‘अल्काइल अमाइन्स केमिकल्स’ कंपनीच्या स्टॉकमध्ये गुंतवणूक केली असती, तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 12000 टक्के पेक्षा जास्त वाढले असते. 2007 मध्ये या कंपनीचे शेअर्स 20 रुपयेवर ट्रेड करत होते. तर आता हा स्टॉक 2539 रुपये किमतीवर पोहचला आहे. ज्या गुंतवणूकदारांनी 2007 मध्ये या स्टॉकवर 1 लाख रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 13 कोटी रुपये झाले आहे. आता कंपनीने आपल्या शेअर धारकांना 500 टक्के लाभांश वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे.
सेबीला दिलेल्या माहिती कंपनीने सांगितले की, संचालक मंडळाने 2022-23 या आर्थिक वर्षासाठी 10 रुपये किंवा प्रति शेअर 2 रुपये दर्शनी मूल्याच्या शेअरवर 500 टक्के लाभांश देण्याची घोषणा केली आहे. आगामी वार्षिक सर्वसाधारण सभेत शेअर धारकांसमोर हा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात येईल.
मार्च तिमाहीचे निकाल :
मार्च 2023 तिमाहीत ‘अल्काइल अमाइन्स केमिकल्स’ कंपनीच्या महसुलात किंचित प्रमाणात घट पाहायला मिळाली आहे. या तिमाहीत कंपनीने 411.67 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. तिमाही काळात कंपनीचा नफा 4.78 टक्के वाढून 48.64 कोटी रुपयेवर पोहचला आहे. मागील वर्षीच्या याच तिमाही काळात कंपनीने 46.42 कोटी रुपये नफा कमावला होता.
मार्च 2023 तिमाहीत, ‘अल्काइल अमाइन्स केमिकल्स’ कंपनीच्या प्रमोटरने कंपनीचे 71.98 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. तर FII ची शेअरहोल्डिंग 2.79 टक्के आहे. DII ने कंपनीचे 1.15 टक्के शेअर्स होल्ड केले आहेत, तर सार्वजनिक शेअर धारकांनी 24.08 टक्के भाग भांडवल धारण केले आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.