21 April 2024 4:20 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gratuity Calculator | पगारदारांनो! जर तुम्ही 7 वर्षे नोकरी केली असेल तर किती लाख ग्रॅच्युइटी मिळेल? येथे जाणून घ्या Ration Card Rules | तुमचा डीलरही कमी रेशन देतो का? फक्त हे काम करा, 1 दिवसात लाईनवर येईल IRCTC Railway General Ticket | रेल्वे जनरल तिकिटाचे हे खास नियम लक्षात ठेवा, अन्यथा तिकीट असूनही मोठा दंड भरावा लागेल EPF Passbook | पगारदारांनो! तुमची बेसिक सॅलरी 10,000 रुपये, वय 30 वर्षे, निवृत्तीनंतर तुम्हाला किती लाख रुपये मिळतील पहा ATM Cash Withdrawal | एटीएममधून पैसे काढताना 'या' लाईटवर लक्ष ठेवा, अन्यथा खाते रिकामे होईल Baleno | मारुती बलेनो कार ठरतेय लोकांची खास पसंती! शोरूम'मध्ये बुकिंगला गर्दी, किंमत आणि फीचर्स जाणून घ्या IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका
x

Allcargo Logistics Share Price | असे शेअर्स निवडा! 178 टक्के परतावा आणि डिव्हीडंड सुद्धा, फायदा घेण्यासाठी रेकॉर्ड डेट पहा

Allcargo Logistics Share Price

Allcargo Logistics Share Price | मागील दोन तीन महिन्यापासून अनेक कंपन्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना लाभांश वाटप करण्याचा सपाटा लावला आहे. या महिन्यातही अनेक कंपन्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. ‘ऑलकार्गो लॉजिस्टिक्स’ कंपनीने ही आपल्या शेअर धारकांना 162.5 टक्के लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने लाभांश वाटपाची रेकॉर्ड डेट जाहीर केली आहे. फायदा घेण्यासाठी रेकॉर्ड तारीख तपासा. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Allcargo Logistics Share Price | Allcargo Logistics Stock Price | BSE 532749 | NSE ALLCARGO)

‘ऑलकार्गो लॉजिस्टिक्स’ लाभांश रेकॉर्ड तारीख :
‘ऑलकार्गो लॉजिस्टिक्स’ कंपनीने स्टॉक एक्स्चेंज नियामक सेबीला माहिती दिली आहे की, “कंपनीने 6 मार्च 2023 रोजी संचालक मंडळाची बैठक आयोजित केली होती, या बैठकीत कंपनीने 2 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या शेअर्सवर 3.25 रुपये लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने या लाभांश वाटपासाठी 15 मार्च 2023 हा दिवस रेकॉर्ड तारीख म्हणून निश्चित केला आहे. कंपनी 16 मार्च 2023 रोजी किंवा नंतर शेअर धारकांच्या खात्यात लाभांश जमा करेल. कंपनी आपल्या पात्र गुंतवणूकदारांना प्रत्येक शेअरवर 162.5 टक्के लाभांश वाटप करणार आहे.

सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ‘ऑलकार्गो लॉजिस्टिक्स’ कंपनीच्या शेअरची किंमत 1.30 टक्क्यांच्या वाढीसह 375.10 रुपयांवर ट्रेड करत होते. आज गुरूवार दिनांक 9 मार्च 2023 रोजी ऑलकार्गो लॉजिस्टिक्स कंपनीचे शेअर्स 0.53 टक्के घसरणीसह 374.95 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील एका वर्षात ऑलकार्गो लॉजिस्टिक्स कंपनीच्या शेअर्सने लोकांना 24 टक्के परतावा कमावून दिला आहे. 2023 या नवीन वर्षात गुंतवणूकदारांना फारसा फायदा मिळाला नाही. या कालावधीत कंपनीच्या शेअरची किंमत 7.64 टक्क्यांनी कमजोर झाली आहे.

ऑलकार्गो लॉजिस्टिक्स कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक परकी किंमत 495 रुपये होती. तर शेअरची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 249 रुपये होती. ऑलकार्गो लॉजिस्टिक्स कंपनीमध्ये प्रवर्तकांनी 69.91 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. त्याच वेळी कंपनीमध्ये FII कडे 10.12 टक्के भाग भांडवल आहे. तर DII कडे 2.20 टक्के भाग भांडवल आहे. कंपनीमध्ये किरकोळ गुंतवणूकदारांकडे 17.75 टक्के भाग भांडवल आहे. कंपनीचे बाजार भांडवल 9197 कोटी रुपये असून, कंपनीचा व्यवसाय 180 देशांमध्ये विस्तारला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Allcargo Logistics Share Price 532749 stock market live on 09 March 2023.

हॅशटॅग्स

Allcargo Logistics Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x