
Alok Industries Share Price | गुरुवार, 09 जानेवारी 2025 रोजी स्टॉक मार्केटमध्ये मोठी घसरण झाल्याचं पाहायला मिळालं आहे. शेअर बाजारातील या अस्थिरतेमध्ये आलोक इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी शेअर फोकसमध्ये आला आहे. आलोक इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी शेअरने ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर गाठला होता. ट्रेडिंग दरम्यान हा शेअर 19.86 रुपयांवर पोहोचला होता.
मात्र आता आलोक इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी शेअर तेजीत आहे आणि शेअरने २० रुपयांची पातळी ओलांडली आहे. आलोक इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी शेअरचा ५२ आठवड्यांची उच्चांकी पातळी 39.05 रुपये होती.
आलोक इंडस्ट्रीज कंपनीत रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी
आलोक इंडस्ट्रीज कंपनी हा रिलायन्स इंडस्ट्रीज आणि जेएम फायनान्शियल असेट्स रिकन्स्ट्रक्शन यांचा संयुक्त उपक्रम आहे. रिलायन्स ग्रुपचा आलोक इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीमध्ये ४०.०१ टक्के आणि जेएम फायनान्शियल असेट्स रिकन्स्ट्रक्शन लिमिटेड कंपनीचा ३४.९९ टक्के हिस्सा आहे. आलोक इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीत सार्वजनिक भागधारकांची हिस्सेदारी २५ टक्के आहे.
आलोक इंडस्ट्रीज कंपनी शेअर टार्गेट प्राईस
स्टॉक मार्केट विश्लेषक सुगंधा सचदेवा यांनी आलोक इंडस्ट्रीज कंपनी शेअरसाठी सकारात्मक संकेत दिले आहेत. सुगंधा सचदेवा यांनी आलोक इंडस्ट्रीज कंपनी शेअर 19.90 रुपयांच्या रेंजमध्ये खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. या शेअरसाठी तज्ज्ञांनी 21.30 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. तसेच 19 रुपये स्टॉपलॉस ठेवण्याचा सल्ला देखील दिला आहे.
कंपनीचे सप्टेंबर अर्थिक तिमाहीचे निकाल कसे होते
दुसऱ्या तिमाहीत आलोक इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीचा तोटा वाढल्याचे आकडेवारी सांगते. दुसऱ्या तिमाहीत आलोक इंडस्ट्रीज कंपनीचा तोटा वाढून २६२.१० कोटी रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या वर्षीच्या दुसऱ्या तिमाहीत आलोक इंडस्ट्रीज कंपनीला १७४.८३ कोटी रुपयांचा तोटा झाला होता. तसेच या कालावधीत आलोक इंडस्ट्रीज कंपनीचे ऑपरेटिंग उत्पन्न ३५.४६ टक्क्यांनी घटून ८८५.६६ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. तसेच आलोक इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीचे इतर उत्पन्नासह एकूण उत्पन्न सप्टेंबर तिमाहीत ३४.९७ टक्क्यांनी घटून ८९८.७८ कोटी रुपयांवर पोहोचले आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.