29 April 2025 9:27 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, टॉप ब्रोकिंग फर्म बुलिश, BUY रेटिंग - NSE: TATAPOWER Tata Technologies Share Price | टाटा तिथे नो घाटा, शेअर्सबाबत मोठी अपडेट, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: TATATECH NHPC Share Price | शेअर प्राईस 100 रुपयांहून कमी; देईल 34 टक्केपर्यंत परतावा, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: NHPC Rattan Power Share Price | पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक मालामाल करणार, 23 टक्के अपसाईड टार्गेट प्राईस - NSE: RTNPOWER HAL Share Price | मल्टिबॅगर पीएसयू डिफेन्स कंपनीचा स्टॉक खरेदी करा, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: HAL Horoscope Today | 29 एप्रिल 2025, तुमच्यासाठी मंगळवारचा दिवस कसा असेल? तुमचे मंगळवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या AWL Share Price | कमाईची संधी सोडू नका; शेअर्समध्ये दिसणार मोठी तेजी, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: AWL
x

Andhra Paper Share Price | स्टॉक स्प्लिट आणि आणि डिव्हीडंड वाटपाची घोषणा, अल्पावधीत मजबूत फायदा करून घ्या

Andhra Paper Share Price

Andhra Paper Share Price | आंध्र पेपर लिमिटेड कंपनीने नुकताच सेबीला 2 मोठ्या कॉर्पोरेट निर्णयाबद्दल माहिती कळवली आहे. आंध्र पेपर लिमिटेड कंपनी आपले शेअर विभाजित करणार आहे. सोबत कंपनी आपल्या गुंतवणुकदारांना अंतिम लाभांश वाटप करणार आहे. ( आंध्र पेपर लिमिटेड कंपनी अंश )

मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर 3 टक्क्यांच्या वाढीसह 535 रुपये किमतीवर पोहोचले होते. दिवसा अखेर हा स्टॉक 324 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. आज बुधवार दिनांक 15 मे 2024 रोजी आंध्र पेपर लिमिटेड कंपनीचे शेअर्स 2.20 टक्के घसरणीसह 512.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

आंध्र पेपर लिमिटेड कंपनीने नुकताच पार पडलेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत आपले 10 रुपये दर्शनी मुल्य असलेले शेअर 2 रुपयेच्या पाच इक्विटी शेअर्समध्ये विभाजित करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने स्टॉक विभाजनाची रेकॉर्ड डेट अद्याप जाहीर केलेली नाही. बहुतांश वेळा अनेक कंपन्या आपल्या शेअर्सची तरलता वाढावी म्हणून स्टॉक स्प्लिट करत असतात.

आंध्र पेपर लिमिटेड कंपनीने आपल्या गुंतवणुकदारांना अंतिम लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. आंध्र पेपर कंपनीने आर्थिक वर्ष 2024 साठी प्रति शेअर 10 रुपये अंतिम लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. याबाबत कंपनीने अद्याप रेकॉर्ड डेट जाहीर केलेली नाही. मागील वर्षी ऑगस्ट 2023 मध्ये कंपनीने प्रति शेअर 12.5 रुपये अंतिम लाभांश वाटप केला होता.

लेटेस्ट शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार मार्च 2023 पर्यंत कंपनीच्या प्रवर्तकांनी कंपनीचे एकूण 72.31 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत. तर सार्वजनिक गुंतवणुकदारांनी कंपनीचे 27.69 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्याची उच्चांक किंमत पातळी 675 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 392.45 रुपये होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Andhra Paper Share Price NSE Live 15 May 2024.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Andhra Paper Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या