
Apollo Micro Systems Share Price | गुरुवार, 16 जानेवारी 2025 रोजी बीएसई सेन्सेक्समध्ये ४०० अंकांची तेजी पाहायला मिळाली होती, तर निफ्टीमध्ये १५० अंकांची तेजी पाहायला मिळाली होती. सलग तीन दिवस सेन्सेक्स आणि निफ्टी तेजीत आहेत. दरम्यान, सेठी फिनमार्ट ब्रोकरेज फर्मने अपोलो मायक्रो सिस्टीम कंपनी शेअरबाबत सकारात्मक संकेत दिले आहेत.
अपोलो मायक्रो सिस्टीम शेअरची सध्याची स्थिती
गुरुवार, 16 जानेवारी 2025 रोजी अपोलो मायक्रो सिस्टीम लिमिटेड कंपनी शेअर 1.25 टक्क्यांनी वाढून 128.15 रुपयांवर पोहोचला होता. अपोलो मायक्रो सिस्टीम कंपनी शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 147.55 रुपये होता, तर शेअरचा 52 आठवड्यांचा निच्चांकी स्तर 87.99 रुपये होता. अपोलो मायक्रो सिस्टीम कंपनीचे एकूण मार्केट कॅप सध्या 3,921 कोटी रुपयांवर आहे.
अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर टार्गेट प्राईस
सेठी फिनमार्ट ब्रोकरेज फर्मच्या तज्ज्ञांनी अपोलो मायक्रो सिस्टीम शेअरसाठी खरेदीचा सल्ला दिला आहे. अपोलो मायक्रो सिस्टीम कंपनी शेअर उच्चांकी स्तरावरून 18 टक्क्यांनी घसरला आहे. सेठी फिनमार्ट ब्रोकरेज फर्मने अपोलो मायक्रो सिस्टीम स्टॉकसाठी ‘BUY’ रेटिंग सह १४५ रुपये टार्गेट प्राईस जाहीर केली आहे. गुंतवणूकदारांना ११५ रुपयांचा स्टॉपलॉस ठेवण्याचा सल्ला देखील ब्रोकरेजने दिला आहे. या डिफेन्स कंपनीची ऑर्डरबुक सुद्धा मजबूत असल्याने लॉन्ग टर्मच्या दृष्टिकोनातून शेअर फायद्याचा ठरू शकतो असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.
अपोलो मायक्रो सिस्टीम शेअरने किती परतावा दिला
मागील ५ दिवसात अपोलो मायक्रो सिस्टीम कंपनी शेअरने 4.98% परतावा दिला आहे. मागील १ महिन्यात या शेअरने 31.29% परतावा दिला आहे. मागील ६ महिन्यात या शेअरने 11.20% परतावा दिला आहे. मागील १ वर्षात अपोलो मायक्रो सिस्टीम कंपनी शेअरने केवळ 4.23% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात या शेअरने 1,497.88% परतावा दिला आहे. लॉन्ग टर्म मध्ये शेअरने 238.22% परतावा दिला आहे. तसेच YTD आधारावर अपोलो मायक्रो सिस्टीम लिमिटेड कंपनी शेअरने 6.19% परतावा दिला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.