
APTECH Share Price | अॅपटेक या IT शिक्षणाशी संबंधित कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना मोठा लाभ देण्याची घोषणा केली आहे. ही कंपनी आपल्या शेअर धारकांना 2 : 5 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करणार आहे. म्हणजेच अॅपटेक ही कंपनी आपल्या शेअर धारकांना 5 शेअर्सवर 2 बोनस शेअर्स मोफत देणार आहे.
कंपनीने बोनस शेअर्स वाटप करण्याची रेकॉर्ड तारीख म्हणून 14 जुलै 2023 हा दिवस निश्चित केला होती. अॅपटेक कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 422.58 रुपये होती. तर शेअरची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 156.33 रुपये होती.
शुक्रवार दिनांक 14 जुलै 2023 रोजी अॅपटेक कंपनीचे शेअर्स बोनस वाटपाच्या रेकॉर्ड तारखेला 9 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. अॅपटेक लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये बोनस शेअर्सच्या रेकॉर्ड तारखेला जबरदस्त खरेदी पाहायला मिळाली आहे. अॅपटेक कंपनीचे शेअर्स शुक्रवार दिनांक 14 जुलै 2023 रोजी 9 टक्के वाढीसह 387.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 345.95 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या स्मॉलकॅप कंपनीचे बाजार भांडवल 2158 कोटी रुपये आहे.
मागील एका वर्षात अॅपटेक कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 115 टक्के परतावा कमावून दिला आहे. 14 जुलै 2022 रोजी अॅपटेक कंपनीचे शेअर्स 224.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील 4 महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 55 टक्के परतावा कमावून दिला आहे. 14 मार्च 2023 रोजी अॅपटेक कंपनीचे शेअर्स 312.70 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मार्च 2023 च्या तिमाहीत कंपनीने 137.02 कोटी रुपये महसूल संकलित केला, त्यात कंपनीने एकूण 33.20 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.