
IPO in Focus | Archean Chemicals इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीच्या इनिशियल पब्लिक ऑफरिंग साठी गुंतवणूक करण्याची मुदत शुक्रवारी संपली. Archean Chemicals कंपनीच्या आयपीओमध्ये पैसे लावलेले लोक आता शेअर्स वाटप होण्याची वाट पाहत आहेत. या IPO मध्ये शेअर्स वाटप करण्याची संभाव्य तारीख 16 नोव्हेंबर 2022 आहे. हा IPO 9 नोव्हेंबर ते 11 नोव्हेंबर 2022 दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. या IPO चा आकार 1462.31 कोटी रुपये होता, जो 32.23 पट अधिक सबस्क्राइब झाला आहे. या IPO मध्ये QIB साठी राखीव असलेला कोटा 48.91 पट अधिक सबस्क्राइब झाला आहे. किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव असलेला कोटा 9.96 पट अधिक सबस्क्राइब झाला आहे.
शेअर्सची शानदार GMP :
शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ग्रे मार्केटमध्ये Archean Chemicals चा शेअर जबरदस्त तेजीत ट्रेड करत होता. स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक तज्ञांच्या मते, आज ग्रे मार्केटमध्ये Archean Chemicals इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीचे शेअर्स 80 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशन मध्ये या शेअरची जीएमपी 66 रुपये अधिक होती. म्हणजेच आज हा स्टॉक तो 14 रुपये वधारला आहे. स्टॉक मार्केट तज्ज्ञांच्या मते, गुंतवणूकदारांच्या भावना बदलल्यानंतर Archean Chemicals कंपनीच्या आयपीओ जीएमपीला जबरदस्त तेजी प्राप्त झाली आहे. स्टॉक मार्केट तज्ज्ञांच्या मते, शेअर बाजारात जेर तेजीचा ट्रेंड कायम राहिला तर ग्रे मार्केटमध्ये Archean Chemicals कंपनीच्या शेअरची किमती गगनाला भिडू शकते.
स्टॉकची लिस्टिंग किंमत :
शेअर बाजारातील गुंतवणूक तज्ज्ञांनी मत व्यक्त केले आहे की, Archean Chemicals कंपनीचा IPO मध्ये शेअर ची GMP 80 रुपये प्रिमियमवर पोहोचली आहे. याचा अर्थ असा की स्टॉक मार्केटमध्ये Archean Chemicals कंपनीचे शेअर्स 487 रुपये किमतीवर सूचीबद्ध होऊ शकतात. IPO मध्ये एका शेअरची किंमत 407 रुपये निश्चित करण्यात आली आहे, आणि आता ग्रे मार्केट मध्ये स्टॉकची किंमत 20 टक्के अधिक प्रिमियम किमतीवर पोहोचली आहे. या कंपनीच्या IPO ला गुंतवणूकदारांनी अप्रतिम प्रतिसाद दिला आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.