 
						Ashok Leyland Share Price | शुक्रवारी देशांतर्गत स्टॉक मार्केट तेजीसह बंद झाला होता. शुक्रवारी स्टॉक मार्केट सेन्सेक्स २२६ अंकांनी वाढला तर एनएसई निफ्टीने पुन्हा एकदा २३,८०० चा टप्पा ओलांडला होता. दरम्यान, ऑटो क्षेत्रातील अशोक लेलँड लिमिटेड कंपनी शेअर सुद्धा तेजीत आला होता. आता स्टॉक मार्केट तज्ज्ञ शर्मिला जोशी यांनी ईटी नाऊ स्वदेश वृत्त वाहिनीशी संवाद साधताना खरेदीचा सल्ला दिला आहे. (अशोक लेलँड कंपनी अंश)
अशोक लेलँड शेअरची सध्याची स्थिती
शुक्रवार, 27 डिसेंबर 2024 रोजी अशोक लेलँड शेअर 0.24 टक्के वाढून 220.66 रुपयांवर पोहोचला होता. अशोक लेलँड कंपनी शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 264.65 रुपये होता, तर शेअरचा 52 आठवड्यांचा निच्चांकी स्तर 157.55 रुपये होता. अशोक लेलँड लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप सध्या 64,753 कोटी रुपये आहे.
अशोक लेलँड शेअरसाठी टार्गेट प्राईस
स्टॉक मार्केट विश्लेषक शर्मिला जोशी यांनी अशोक लेलँड शेअर लॉन्ग टर्मसाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. पहिलं कारण म्हणजे इलेक्ट्रिक वाहनांची, विशेषत: मास ट्रान्सपोर्टसाठी बसची बाजारपेठ भविष्यात खूप चांगली होऊ शकते. अशोक लेलँड कंपनीची उपकंपनी स्विच मोबिलिटीच्या अनेक इलेक्ट्रिक बस बाजारात आल्या आहेत.
दुसरे कारण म्हणजे अशोक लेलँड लिमिटेड कंपनीने नुकतीच दरवाढीची घोषणा केली आहे. ज्यामुळे कंपनीचा EBITDA मार्जिन देखील सुधारेल अशी अपेक्षा आहे. दरम्यान, स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी अशोक लेलँड शेअरसाठी २६० रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. पुढील १२ ते १८ महिन्यांत शेअर ही टार्गेट प्राईस गाठेल असा तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
अशोक लेलँड शेअरने मल्टिबॅगर परतावा दिला
मागील ५ दिवसात अशोक लेलँड शेअरने 1.55% परतावा दिला आहे. मागील १ महिन्यात अशोक लेलँड शेअर 4.72% घसरला आहे. मागील ६ महिन्यात हा शेअर 8.78% घसरला आहे. मागील १ वर्षात या शेअरने 25.88% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात या शेअरने 176.86% परतावा दिला आहे. YTD आधारावर शेअरने 18.67% परतावा दिला आहे. तर लॉन्ग टर्ममध्ये अशोक लेलँड शेअरने गुंतवणूकदारांना 9,663 टक्के परतावा दिला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		