
Aurionpro Solutions Share Price | शेअर बाजारात अनेक पेनी स्टॉक्स आहेत, जे गुंतवणुकदारांना अल्पावधीत करोडपती बनवू शकतात. आज या लेखात आपण अशाच एका पेनी स्टॉकबद्दल चर्चा करणार आहोत, ज्याने आपल्या गुंतवणुकदारांचे पैसे अनेक पट गुणाकार केले आहेत.
3 वर्षांत 1,500 टक्के परतावा दिला
आपण ज्या स्टॉक बद्दल चर्चा करत आहोत, त्याचे नाव आहे, ‘ऑरिऑनप्रो सोल्यूशन्स लिमिटेड’. या कंपनीच्या शेअरने अवघ्या तीन वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 1,500 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज शुक्रवार दिनांक 26 मे 2023 रोजी ऑरियोनप्रो सॉल्यूशंस लिमिटेड कंपनीचे शेअर्स 5.00 टक्के वाढीसह 748.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
गुंतवणुकीचे मूल्य किती झाले
22 मे 2020 साली ऑरिऑनप्रो सोल्यूशन्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 44.55 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 25 मे 2023 म्हणजेच या कंपनीचे शेअर्स 730 रुपये किमतीवर पोहचले आहेत. तीन वर्षांपूर्वी ज्या लोकांनी या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 16.38 लाख रुपये झाले आहे.
मार्च 2023 पर्यंत संपलेल्या तिमाहीत सात प्रवर्तकांनी कंपनीचे 33 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत. तर 13,099 सार्वजनिक शेअर धारकांनी 67 टक्के भाग भांडवल होल्ड केले आहे. यापैकी 12,234 सार्वजनिक गुंतवणूकदारांनी 37.24 लाख शेअर्स म्हणजेच 16.34 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत. मार्च 2023 मध्ये संपलेल्या तिमाहीत 2 लाखापेक्षा जास्त गुंतवणूक असलेल्या 54 भागधारकांनी 17.14 टक्के भाग भांडवल होल्ड केले आहेत.
आर्थिक तिमाही
मार्च 2023 च्या तिमाहीत ऑरिऑनप्रो सोल्यूशन्स लिमिटेड कंपनीने मागील आर्थिक वर्षांच्या याच तिमाहीत 18.97 कोटी रुपयेच्या तुलनेत 25.08 कोटी रुपये नफा कमावला आहे. मार्च 2022 तिमाहीतील 137.47 कोटी रुपयांच्या तुलनेत मार्च 2023 तिमाहीत कंपनीने 38.69 टक्के वाढीसह 190.66 कोटी रुपये विक्री नोंदवली आहे.
मागील आर्थिक वर्षात कंपनीची विक्री 30.56 टक्के वाढीसह 659.33 कोटीवर पोहचली होती. आर्थिक वर्षात कंपनीचा निव्वळ नफा 37.72 टक्के वाढीसह 97.33 कोटी रुपयेवर पोहचला आहे. ऑरिऑनप्रो सोल्यूशन्स लिमिटेड ही एक IT क्षेत्रात व्यवसाय करणारी कंपनी आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.