
Authum Investment Share Price | ऑथम इन्व्हेस्टमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर या स्मॉल कॅप कंपनीच्या शेअरने मागील 4 वर्षात आपल्या शेअर धारकांना बंपर कमाई करून दिली आहे. मागील 4 वर्षांत ऑथम इन्व्हेस्टमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे शेअर्स 19000 पेक्षा जास्त वाढले आहेत. ऑथम इन्व्हेस्टमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे शेअर्स मागील चार वर्षात 2 रुपये किमतीवरून 400 रुपये किमतीवर पोहचले आहेत.
ऑथम इन्व्हेस्टमेंट कंपनीच्या शेअरमध्ये ज्यां लोकांनी पैसे लावले होते, ते लोक आता करोडपती झाले आहेत. शुक्रवार दिनांक 29 सप्टेंबर 2023 रोजी ऑथम इन्व्हेस्टमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर स्टॉक 19.99 टक्के वाढीसह 482.60 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
1 लाखावर 1.9 कोटी परतावा
ऑथम इन्व्हेस्टमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे शेअर्स 13 सप्टेंबर 2019 रोजी 2.13 रुपये किमतीवर ट्रेड करत होते 28 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 402.20 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. ऑथम इन्व्हेस्टमेंट कंपनीच्या शेअर्सने मागील 4 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 19800 टक्के नफा कमावून दिला आहे. ज्या लोकांनी 13 सप्टेंबर 2019 रोजी ऑथम इन्व्हेस्टमेंट कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणूकीचे मूल्य 1.98 कोटी रुपये झाले आहे.
शेअर्सची कामगिरी
ऑथम इन्व्हेस्टमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या शेअर्सने मागील 3 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 3300 टक्के परतावा कमवून दिला आहे. 11 सप्टेंबर 2020 रोजी या कंपनीचे शेअर्स 11.54 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ऑथम इन्व्हेस्टमेंट कंपनीचे शेअर्स 28 सप्टेंबर 2023 रोजी 402.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
मागील 3 वर्षांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 3385 टक्के नफा कमावून दिला आहे. जर तुम्ही 11 सप्टेंबर 2020 रोजी ऑथम इन्व्हेस्टमेंट कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 34.85 लाख रुपये झाले असते. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 580 रुपये होती. तर नीचांकी किंमत पातळी 154.50 रुपये होती.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.