
Avance Technologies Share Price | अव्हान्स टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनीच्या पेनी स्टॉकमध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 1.38 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर बुधवारी हा स्टॉक 1.32 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. ( अव्हान्स टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनी अंश )
अव्हान्स टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स मागील काही दिवसापासून बॅक टू बॅक अपर सर्किट हीट करत आहेत. आज शुक्रवार दिनांक 5 एप्रिल 2024 रोजी अव्हान्स टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनीचे शेअर्स 1.45 टक्के वाढीसह 1.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
मागील पाच दिवसात अव्हान्स टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स 10 टक्के वाढले आहेत. मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 263.16 टक्के परतावा कमावून दिला आहे. याकाळात कंपनीच्या शेअर्सची किंमत 38 पैशांवरून वाढून सध्याच्या किमतीवर पोहचली आहे.
YTD आधारे या कंपनीचे शेअर्स 66.27 टक्के मजबूत झाले आहेत. अवघ्या एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 1,871.43 टक्के नफा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 1.71 रुपये होती. तर नीचांक किंमत 0.07 रुपये होती. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 273.50 कोटी रुपये आहे.
डिसेंबर 2023 तिमाहीत अव्हान्स टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनीचा निव्वळ नफा मागील वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत 75 टक्के वाढीसह 0.14 कोटी रुपये नोंदवला गेला होता. डिसेंबर 2022 तिमाहीत या कंपनीचा नफा 0.08 कोटी रुपये होता. डिसेंबर 2023 ला संपलेल्या तिमाहीत कंपनीची विक्री 1.36 टक्के घसरणीसह 3.62 कोटी रुपये नोंदवली गेली होती. तर डिसेंबर 2022 ला संपलेल्या तिमाहीत कंपनीची विक्री 3.67 कोटी रुपये होती.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.