 
						Avantel Share Price | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात मजबूत परतावा देणाऱ्या शेअरमध्ये गुंतवणूक करून भरघोस कमाई करू इच्छित असा तर तुम्ही अवांटेल लिमिटेड या संरक्षण क्षेत्रातील कंपनीचे शेअर्स खरेदी केले पाहिजे. नुकताच या कंपनीला भारतीय नौदलाने 5.3 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर दिली आहे.
अवांटेल लिमिटेड कंपनीला भारतीय नौदलाने गंभीर सॅटकॉम उपकरणांचा पुरवठा करण्याची 5.3 कोटी रुपयेची ऑर्डर दिली आहे. यापूर्वी अवांटेल लिमिटेड कंपनीला 68 कोटी रुपये मूल्याचे काम मिळाले होते. त्यात कंपनीला न्यू स्पेस इंडिया कंपनीसोबत सॅटेलाइट टर्मिनल उभारण्याची जबाबदारी देण्यात आली होती.
अवांटेल लिमिटेड ही कंपनी मुख्यतः संरक्षण आणि दळणवळण क्षेत्रात व्यवसाय करणारी एक अग्रणी कंपनी म्हणून प्रसिद्ध आहे. मागील सहा महिन्यांत अवांटेल लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 132 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज मंगळवार दिनांक 23 जानेवारी 2024 रोजी अवांटेल लिमिटेड कंपनीचे शेअर्स 6.43 टक्के वाढीसह 129.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
अवांटेल लिमिटेड ही कंपनी मुख्यतः उच्च पॉवर ब्रॉडबँड, वायरलेस सॅटेलाइट कम्युनिकेशन आणि ब्रॉडबँड ऍक्सेस तंत्रज्ञानाच्या डिझाइन आणि विकास कामात गुंतलेली आघाडीची कंपनी आहे. ही कंपनी प्रोप्रायटरी सॉफ्टवेअर टूल्ससह वायरलेस आणि ऍक्सेस उत्पादनांसह डिझाइन डेव्हलपमेंट एकीकरण यासारख्या सेवा देखील प्रदान करण्याचा व्यवसाय करते. मागील 3 वर्षात अवांटेल लिमिटेड कंपनीच्या शेअर्स आपल्या गुंतवणूकदारांना 1600 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सची किंमत सात टक्के वाढली आहे.
मागील एका वर्षात अवांटेल लिमिटेड कंपनीचे शेअर्स 27.58 रुपये किमतीवरून तब्बल 343 टक्के मजबूत झाले आहेत. कोरोना काळात 3 एप्रिल 2020 रोजी अवांटेल लिमिटेड कंपनीचे शेअर्स 2.81 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या किमतीवर ज्या लोकांनी अवांटेल लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली होती, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य एकूण 4000 टक्क्यांपेक्षा जास्त वाढले आहेत. अवांटेल लिमिटेड कंपनीचे एकूण बाजार भांडवल 2970 कोटी रुपये आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 136 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 24.20 रुपये होती.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		