
Balu Forge Share Price | बालू फोर्ज इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 18 टक्क्यांच्या वाढीसह 267 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. बालू फोर्ज इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी सप्टेंबर 2023 च्या तिमाहीचे निकाल जाहीर केल्याने पाहायला मिळत आहे.
शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार आशिष कचोलिया यांनी देखील बालू फोर्ज कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी गुंतवणुक केली आहे. बालू फोर्ज इंडस्ट्रीज कंपनीच्या तिमाही नफ्यात तब्बल 382 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. आज गुरूवार दिनांक 2 नोव्हेंबर 2023 रोजी बालू फोर्ज इंडस्ट्रीज स्टॉक 1.29 टक्के वाढीसह 243.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
बालू फोर्ज इंडस्ट्रीज कंपनीने 2023-24 या चालू आर्थिक वर्षाच्या सप्टेंबर तिमाहीत 23.27 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील वर्षी याच तिमाही काळात बाळू फोर्ज कंपनीने 4.83 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. बालू फोर्ज इंडस्ट्रीज कंपनीचा निव्वळ नफा मार्जिन सप्टेंबर 2023 तिमाहीत 16.71 टक्के नोंदवला गेला आहे.
मागील वर्षी याच तिमाही कालावधीत कंपनीचा निव्वळ नफा मार्जिन 7.97 टक्के होता. बाळू फोर्ज इंडस्ट्रीज कंपनीने वार्षिक आधारावर 130 टक्के वाढीसह 13926 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. मागील वर्षी याच तिमाही काळात कंपनीने 112.39 कोटी रुपये महसूल संकलित केला होता.
शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणुकदार आशिष कचोलिया यानी बालू फोर्ज इंडस्ट्रीज कंपनीचे 21.65 लाख शेअर्स म्हणजेच जवळपास 2.11 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत. मागील 11 महिन्यांत बालू फोर्ज कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 400 टक्के परतावा कमावून दिला आहे. 1 डिसेंबर 2022 रोजी बालू फोर्ज इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 54.70 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 1 नोव्हेंबर 2023 रोजी हा स्टॉक 267 रुपये किमतीवर पोहचला होता.
2023 या वर्षात आतापर्यंत बालू फोर्ज कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणुकदारांना 275 टक्के नफा कमावून दिला आहे. 2 जानेवारी 2023 रोजी हा कंपनीचे शेअर्स 66.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. बालू फोर्ज इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 53.90 रुपये होती.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.