16 December 2024 1:29 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Share Price | मल्टिबॅगर PSU एनएचपीसी शेअर रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: NHPC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत - NSE: NBCC SBI Share Price | SBI बँक सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: SBIN Adani Energy Solutions Share Price | अदानी एनर्जी सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIENSOL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
x

Bank Account Alert | अलर्ट! तुमचं मुंबई पुणेसह महाराष्ट्रातील यापैकी कोणत्याही बँकेत खातं आहे? RBI ची 5 बँकांवर कारवाई

Bank Account Alert

Bank Account Alert | भारतीय रिझर्व्ह बँकेने 5 सहकारी बँकांवर कडक कारवाई केली आहे. या सर्व बँकांवर नियमांचे पालन न केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील काही बँका आहेत. विशेष करून मुंबई आणि पुण्यातील बँकांचा समावेश आहे.

ज्या बँकांवर कारवाई करण्यात आली आहे, त्यामध्ये कोंटाई को-ऑपरेटिव्ह बँक ऑफ पश्चिम बंगाल, सर्वोदय को-ऑपरेटिव्ह बँक ऑफ मुंबई, मानमंदिर को-ऑपरेटिव्ह बँक ऑफ विटा महाराष्ट्र, सनमित्र सहकारी बँक ऑफ पुणे महाराष्ट्र आणि मेहसाणा गुजरातची लखवार नागरिक सहकारी बँक यांचा समावेश आहे.

मुंबईतील सर्वोदय को-ऑपरेटिव्ह बँक
मुंबईतील सर्वोदय को-ऑपरेटिव्ह बँकेला एक लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. सुपरवायझरी अॅक्शन फ्रेमवर्कअंतर्गत बँकेला हा दंड ठोठावण्यात आला आहे.

विटा येथील मानमंदिर को-ऑपरेटिव्ह बँकेला रिझर्व्ह बँकेने तीन लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. केवायसी निर्देश 2016 अंतर्गत नियमांचे पालन न केल्याने हा दंड ठोठावण्यात आला आहे. याशिवाय डिपॉझिट अकाऊंट्स – प्रायमरी (शहरी) सहकारी बँकेच्या नियमांचे पालन न केल्याबद्दलही कारवाई करण्यात आली आहे.

पुण्यातील सन्मित्र सहकारी बँक
पुण्यातील सन्मित्र सहकारी बँकेला एक लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. डिपॉझिट अकाऊंट्स – प्रायमरी (शहरी) सहकारी बँकेच्या नियमांचे पालन न केल्याचा ठपका बँकेवर ठेवण्यात आला आहे.

गुजरातमधील मेहसाणा येथील लखवार नागरिक सहकारी बँक लिमिटेडलाही दोन लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. संचालक व त्याच्या कुटुंबीयांना कर्ज देण्यासंदर्भातील नियमांचे पालन न केल्याने बँकेला हा दंड ठोठावण्यात आला आहे.

काय आहे रिझर्व्ह बँकेची कारवाई
रिझर्व्ह बँकेने दिलेल्या माहितीनुसार, केवायसी नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पश्चिम बंगालमधील पूर्व मेदिनीपूरयेथील कोंटाई को-ऑपरेटिव्ह बँकेला एक लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

आर्थिक वर्षात आतापर्यंत ४० कोटींहून अधिक दंड
रिझर्व्ह बँकेने चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत नियमांचे पालन न केल्याबद्दल बँका, एनबीएफसी आणि इतर संस्थांना ४० कोटी रुपयांहून अधिक दंड ठोठावला आहे. सहकारी बँकांना १७६ प्रकरणांमध्ये १४ कोटींहून अधिक दंड ठोठावण्यात आला आहे. लोकसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात सरकारने ही माहिती दिली आहे. खासगी क्षेत्रातील बँकांना १२ कोटी, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना ३ कोटी ६५ लाख, विदेशी बँकांना ४ कोटी ६५ लाख आणि एनबीएफसीला ४ कोटी ३९ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Bank Account Alert on RBI penalty 21 December 2023.

हॅशटॅग्स

#Bank Account Alert(30)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x