
Bank of India Share Price | बँक ऑफ इंडिया स्टॉक मध्ये कमालीची तेजी पाहायला मिळत आहे. शेअर बाजारातील अनेक तज्ञांनी बँक ऑफ इंडियाचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. अॅक्सिस सिक्युरिटीज फर्मच्या तज्ञांच्या मते, नवीन वर्षात बँक ऑफ इंडिया स्टॉक गुंतवणुकदारांना मालामाल करू शकतो. तज्ञांनी पुढील 1 वर्षासाठी या बँकेचे शेअर्स होल्ड करण्याचा सल्ला दिला आहे. आज मंगळवार दिनांक 2 जानेवारी 2024 रोजी बँक ऑफ इंडिया स्टॉक 0.84 टक्के वाढीसह 114 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. BOI Share Price
शेअर बाजारातील तज्ञांनी नवीन वर्षात गुंतवणूक करून कमी करण्यासाठी बँक ऑफ इंडिया स्टॉकची निवड केली आहे. पुढील एका वर्षात या बँकेचे शेअर्स 150-165 रुपये किंमत स्पर्श करू शकतात, असा विश्वास तज्ञांनी व्यक्त केला आहे. तज्ञांनी बँक ऑफ इंडियाचे शेअर्स खरेदी करताना 85 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे.
तज्ञांचे मत :
* बँक ऑफ इंडिया स्टॉक : खरेदी करा
* सध्याची किंमत : 114 रुपये
* टार्गेट प्राइस : 150/165 रुपये
* स्टॉप लॉस : 85 रुपये
* गुंतवणूकीचा कालावधी : 1 वर्ष
1 जानेवारी 2024 रोजी या नवीन वर्षाच्या पहिल्याच ट्रेडिंग सेशनमध्ये बँक ऑफ इंडिया स्टॉक 112.55 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. आज देखील या बँकेचे शेअर्स हिरव्या निशाणीवर ट्रेड करत होते. तज्ञांनी बँक ऑफ इंडिया स्टॉकवर 165 रुपयेपर्यंत टारगेट प्राइस जाहीर करून स्टॉक खरेदीचा सल्ला दिला आहे. मागील 6 महिन्यांत या बँकिंग स्टॉकने लोकांना 45 टक्क्यांपेक्षा जास्त नफा कमावून दिला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.