3 May 2025 12:59 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

Bank of Maharashtra | बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नेमकं चाललंय काय? ग्राहकांचे पैसे किती सुरक्षित? एवढा निष्काळजीपणा? चिंताजनक बातमी

Bank of Maharashtra

Bank of Maharashtra | बँक ऑफ महाराष्ट्र ही ग्राहकांच्या अत्यंत विश्वासातील आणि आर्थिकदृष्ट्या भक्कम असलेली बँक म्हणून प्रसिद्ध आहे. बँकेच्या ग्राहकांमध्ये सर्वाधिक संख्या ही मध्यमवर्गीयांची आहे. हाच मध्यमवर्गीय ग्राहक, बँक ऑफ महाराष्ट्रच्या अनेक योजनांमध्ये अल्प बचतीपासून ते मोठी गुंतवणूक व्याजाचे वार्षिक दर पाहून स्वतःच्या शक्य कालावधीसाठी गुंतवणूक करत असतो. मात्र करोडो लोकांचे पैसे बँकेत असताना याच बँकेच्या निष्काळजीपणाचा धक्कादायक बातमी समोर आली आहे.

बँक ऑफ महाराष्ट्र – कर्मचाऱ्यांकडून निष्काळजीपणाचा कहर
मावळ तालुक्यातील कामशेत मधून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. कामशेत येथे असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकेच्या शटरला तब्बल तीन दिवसापासून टाळे लावले नसल्यामुळे उघडीच राहिली होती. ही बाब सकाळी नऊच्या सुमारास स्थानिक व्यापारी विलास बटेवरा यांच्या लक्षात आली. त्यांनतर त्यांनी तातडीने पोलीस स्टेशनला याची माहिती दिली. पोलिसांनी संबंधित बँकेच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून हा सर्व प्रकार त्यानां सांगितला. यानंतर बँकेचे कर्मचारी ननावरे यांनी अकरा वाजण्याच्या सुमारास बँकेला कुलूप लावले. या घटनेतून पुन्हा एकदा बँकेचा कारभार चव्हाट्यावर आला आहे.

बँकेत लाखो खातेदारांचे पैसे
दरम्यान, मावळ तालुक्यातील मध्यवर्ती भाग असलेल्या बाजार पेठेत ही बँक ऑफ महाराष्ट्र कार्यकरत आहे. या बँकेत अनेक खातेदारांचे खाते असून पेन्शनर्स, नोकरदा, बचतगट, शेतकरी, व्यावसायिक, यांची खाती आहेत. कामशेत परिसरात एकमेव नॅशनल बँक असल्यामुळे लोकांना या बँकेशिवाय दुसरा पर्याय नाही. आधीच या बँकेबाबत अनेक नागरिकांच्या तक्रारी आहेत. त्यातच या घटनेमुळे बँकेचा बेजबाबदारपणा दिसून येत आहे.

कुलूप न लावल्यामुळे बँक तब्बल तीन दिवस उघडीच होती
शुक्रवारी संध्याकाळी चार वाजल्यानंतर शटर खाली ओढून टाळे न लावताच बँकेतील सर्व कर्मचारी तसेच निघून गेले. त्यामुळे शुक्रवार, चौथा शनिवार आणि रविवारी अकरा वाजेपर्यंत बँकचे कुलूप न लावल्यामुळे बँक तब्बल तीन दिवस उघडीच होती. यामुळे नागरींकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. या बँकेत अनेक खातेदारांचे पैसे जमा असून कदाचित काही घटना घडली असती, तर याला जबाबदार कोण? असे नागरिकांमध्ये बोलले जात आहे. संबंधित मॅनेजर आणि कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात यावी अशी तीव्र मागणी नागरिक करत आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Bank of Maharashtra alert for customers check details on 26 September 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Bank of Maharashtra(61)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या