
Bank of Maharashtra | बुधवारी कमकुवत सुरुवातीनंतर शेअर बाजारात जबरदस्त सुधारणा नोंदवली जात आहे. बाजारातील प्रमुख निर्देशांक हिरव्या रंगात आहेत. सेन्सेक्स 430 अंकांनी वधारून 70,800 च्या पातळीवर पोहोचला. निफ्टीही जवळपास 150 अंकांच्या वाढीसह 21400 च्या जवळ व्यवहार करत आहे. सरकारी बँकिंग, फार्मा, एफएमजीसी आणि धातू क्षेत्रात जोरदार खरेदी होत आहे. निफ्टीमध्ये हिंडाल्को आणि डॉ. रेड्डीज करी या कंपन्यांचे शेअर्स सर्वाधिक ४ टक्क्यांनी वधारले.
बँक ऑफ महाराष्ट्र शेअर – आज एकदिवसात 5.19 टक्के परतावा दिला
शेअर बाजारातील प्रचंड तेजीमुळे काही बँकिंग स्टॉकमध्ये उसळी पाहायला मिळाली होती. बँक ऑफ महाराष्ट्रचे शेअर्स तर अप्रतिम वाढीसह ट्रेड करत होते. टॉप ब्रोकिंग फर्मने बँक ऑफ महाराष्ट्रचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. टेक्निकल चार्टवर बँक ऑफ महाराष्ट्र स्टॉक मजबूत वाढीचे संकेत देत आहे. आज बुधवारी दिनांक २४ जानेवारी 2024 रोजी बँक ऑफ महाराष्ट्र स्टॉक 5.19 टक्के वाढीसह 53.75 रुपये किमतीवर क्लोज झाला.
बँक ऑफ महाराष्ट्र शेअर्सवर कालावधीनुसार गुंतवणूकदारांना झालेला फायदा
1. बँक ऑफ महाराष्ट्र शेअर्स – कालावधी ५ वर्ष – फायदा मिळाला 281.85%
2. बँक ऑफ महाराष्ट्र शेअर्स – कालावधी १ वर्ष – फायदा मिळाला 80.94%
3. बँक ऑफ महाराष्ट्र शेअर्स – कालावधी ६ महिने – फायदा मिळाला 60.39%
4. बँक ऑफ महाराष्ट्र शेअर्स – कालावधी YTD आधारावर – फायदा मिळाला 17.52%
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.