
BCL Industries Share Price | बीसीएल इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीच्या संचालक मंडळाने बुधवारी पार पडलेल्या बैठकीनंतर स्टॉक स्प्लिटची रेकॉर्ड तारीख जाहीर केली आहे. बीसीएल इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी 27 ऑक्टोबर 2023 या रेकॉर्ड तरिखेच्या दिवशी स्टॉक स्प्लिट करणार आहे. मागील काही दिवसापासून या कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. BCL Share Price
कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हा स्मॉल कॅप स्टॉक तेजीसह ओपन झाला होता, आणि स्टॉक दिवसभराच्या ट्रेडिंगमध्ये 523 रुपये या इंट्राडे उच्चांक किमतीवर पोहोचला होता. आज शुक्रवार दिनांक 6 ऑक्टोबर 2023 रोजी बीसीएल इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीचे शेअर्स 2.61 टक्के वाढीसह 538.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. BCL Industries Share
बीसीएल इंडस्ट्रीज लिमिटेड कमोमक संचालक मंडळाने आपले शेअर्स 1:10 या प्रमाणात विभाजित करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. या कंपनीने बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये निवेदन जाहीर करून माहिती दिली की, कंपनीने स्टॉक स्प्लिटची रेकॉर्ड तारीख म्हणून 27 ऑक्टोबर 2023 हा दिवस निश्चित केला आहे. कंपनीच्या निवेदनानुसार, कंपनीच्या संचालक मंडळाने आपले 10 रुपये दर्शनी मुल्य असलेले शेअर्स 10 भागात विभाजित करण्याची घोषणा केली आहे.
बीसीएल इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीचे शेअर्स 2023 या वर्षात गुंतवणुकदारांना बंपर परतावा देणाऱ्या स्टॉकच्या यादीत सामील आहेत. बीसीएल इंडस्ट्रीज लिमिटेड या स्मॉल कॅप कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना भरघोस परतावा कमावून दिला आहे.
YTD आधारे या कंपनीच्या शेअरची किंमत 324 रुपयेवरून वाढून 538 रुपये किमतीवर पोहचली आहे. या काळात गुंतवणूकदारांनी तब्बल 60 टक्के नफा कमावला आहे. मागील पाच वर्षांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 325 टक्के नफा कमावून दिला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.