BEL Share Price | PSU कंपनीबाबत अपडेट, शॉर्ट टर्म मध्ये दिला 47% परतावा, स्टॉक पुढेही मालामाल करणार – Marathi News

BEL Share Price | बीईएल या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये शुक्रवारी जबरदस्त तेजी पाहायला मिळाली होती. मागील काही महिन्यांपासून या कंपनीचे शेअर्स (NSE: BEL) सातत्याने विक्रीच्या दबावत ट्रेड करत होते. मागील तीन महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना नकारात्मक परतावा दिला आहे. (बीईएल कंपनी अंश)

गुरुवारी बीईएल स्टॉक 5 टक्क्यांच्या घसरणीसह 267.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. दिवसाअखेर हा स्टॉक 3.57 टक्क्यांच्या घसरणीसह 272.75 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. शुक्रवार दिनांक 20 सप्टेंबर 2024 रोजी बीईएल कंपनीचे शेअर्स 1.83 टक्के वाढीसह 277.70 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

कंपनीची ऑर्डर बुक मजबूत
बीईएल कंपनीची ऑर्डर बुक मजबूत आहे. बीईएल कंपनीचे शेअर्स सध्या सुधारण्याच्या टप्प्यात आहेत. 10 जुलै 2024 रोजी बीईएल कंपनीचे शेअर्स 340.35 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किमतीवर पोहचले होते. या किमतीवरून हा स्टॉक 20 टक्क्यांनी खाली आला आहे. मागील 6 महिन्यांत बीईएल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 47 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 95 टक्के वाढली आहे.

मागील 5 वर्षात 685% परतावा दिला
मागील दोन वर्षांत बीईएल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 146 टक्के नफा कमावून दिला आहे. गेल्या 3 वर्षांत बीईएल स्टॉक तब्बल 300 टक्के वाढला आहे. मागील 5 वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 685 टक्के परतावा कमावून दिला आहे.

बीईएल ही केंद्रीय संरक्षण मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली व्यवसाय करणारी डिफेन्स इलेक्ट्रॉनिक्स कंपनी आहे. या कंपनीचे मुख्यालय बेंगळुरूमध्ये आहे. बीईएल ही कंपनी भारतीय लष्कर, भारतीय नौदल आणि भारतीय हवाई दलासाठी इलेक्ट्रॉनिक उत्पादने आणि प्रणालींचे उत्पादन करते.

Latest Marathi News | BEL Share Price 21 September 2024 Marathi News.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.