
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीने दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. या बातमीचा सकारात्मक परिणाम कंपनीच्या (NSE: BEL) शेअरवर पाहायला मिळाला. शुक्रवार 25 ऑक्टोबर रोजी हा शेअर 1.55 टक्के वाढून 275.55 रुपयांवर पोहोचला होता. (भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनी अंश)
बीईएल कंपनी – दुसऱ्या तिमाहीचे निकाल
दुसऱ्या तिमाहीत भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीचा निव्वळ नफा ३८ टक्क्यांनी वाढून १०९२.४५ कोटी रुपयांवर पोहोचला आहे, जो मागील वर्षी याच तिमाहीत ७८० कोटी रुपये इतका होता. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीचे दुसऱ्या तिमाहीत कामकाजातून मिळणारे उत्पन्न 15 टक्क्यांनी वाढून 4583 कोटी रुपयांवर पोहोचले आहे, जे मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत 3993 कोटी रुपये इतके होते हे आकडेवारीतून समोर आलं आहे.
दुसऱ्या तिमाहीबाबत अधिक तपशील
दुसऱ्या तिमाहीत भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीचा एकूण स्वतंत्र खर्च 3299 कोटी रुपये झाला आहे, जो मागील वर्षीच्या तुलनेत 7 टक्क्यांनी अधिक आहे. पहिल्या तिमाहीत खर्च ३३६३ कोटी रुपयांवरून घसरला होता, त्यात २ टक्क्यांची घसरण दिसून आली आहे. दुसऱ्या तिमाहीपर्यंत भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीने आपली एकूण मालमत्ता 39420.16 कोटी रुपये नोंदविली, जी 31 मार्च 2024 तिमाहीअखेर 39155.65 कोटी रुपये इतकी होती.
कंपनी उलाढाल वाढली
२०२५ मधील पहिल्या सहामाहीत भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीने 8530.43 कोटी रुपयांची उलाढाल साध्य केली, जी मागील वर्षाच्या याच कालावधीतील 7364.82 कोटी रुपयांच्या उलाढालीच्या तुलनेत 15.83 टक्क्यांनी अधिक वाढल्याचं आकडेवारी सांगते आहे. दुसऱ्या तिमाहीत भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीने 4425.29 कोटी रुपयांची उलाढाल केली आहे, जी मागील वर्षी याच कालावधीत 3918.13 कोटी रुपये इतकी होती.
कंपनी ऑर्डरबुक
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीने अधिक माहिती देताना सांगितले की, दुसऱ्या तिमाहीच्या अखेरीस भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीची ऑर्डरबुक 74595 कोटी रुपये आहे आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीने 1.49 रुपये प्रति शेअर EPS जाहीर केला आहे, जो वर्षभरापूर्वी 1.11 रुपये प्रति शेअर होता.
शेअरने किती परतावा दिला
मागील ६ महिन्यात या शेअरने 15.97% परतावा दिला आहे. मागील १ वर्षात या शेअरने 110.02% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात या शेअरने 608.35% परतावा दिला आहे. YTD आधारावर या शेअरने 48.99% परतावा दिला आहे. तसेच लॉन्ग टर्म गुंतवणूकदारांना या शेअरने 125150% परतावा दिला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.