16 May 2025 12:58 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, मजबूत कमाईची संधी सोडू नका - NSE: TATAPOWER IRFC Share Price | 30 टक्के अपसाईड परतावा मिळेल, मल्टिबॅगर पीएसयू शेअर्सबाबत फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC Mazagon Dock Share Price | रॅलीगीअर ब्रोकिंग फर्म बुलिश, लेटेस्ट टार्गेट प्राईस अलर्ट, मोठ्या कमाईची संधी - NSE: MAZDOCK HAL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर मालामाल करणार, मोतीलाल ओसवाल बुलिश, BUY रेटिंग - NSE: HAL Vedanta Share Price | जबरदस्त अपसाईड टार्गेट प्राईस जाहीर, BUY रेटिंग, मल्टिबॅगर परतावा देणारा शेअर - NSE: VEDL Patel Engineering Share Price | 42 रुपयांचा शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: PATELENG Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: JIOFIN
x

BEL Share Price | मजबूत पैसा देणार हा PSU शेअर, तज्ज्ञांकडून रेटिंग अपडेट, टार्गेट प्राईस नोट करा

BEL Share Price

BEL Share Price | बीईएल म्हणजेच भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. ज्या गुंतवणूकदारांनी 1 जानेवारी 1999 रोजी बीईएल स्टॉकमध्ये गुंतवणूक केली होती, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 140513 टक्क्यांपेक्षा जास्त वाढले आहे. 2024 यावर्षात बीईएल स्टॉक 68 टक्के वढला आहे. तर मागील 12 महिन्यांत बीईएल स्टॉक तब्बल 156 टक्के वाढला आहे. ( भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनी अंश )

बीईएल कंपनीचे एकूण बाजार भांडवल 2.26 लाख कोटी रुपये आहे. नुकताच या कंपनीला आर्मर्ड व्हेईकल कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीने 3172 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर मिळाली आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी बीईएल स्टॉक 1.6 टक्के वाढीसह ट्रेड करत होता. आज सोमवार दिनांक 1 जुलै 2024 रोजी बीईएल स्टॉक 0.16 टक्के वाढीसह 306.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

नुकताच बीईएल कंपनीला 481 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर मिळाली होती, ज्या अंतर्गत कंपनीला डॉपलर, वेदर रडर, क्लासरूम जॅमर, स्पेअर आणि सेवा प्रदान करण्याचे काम देण्यात आले होते. आर्म्ड व्हेईकल कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीने दिलेल्या 3172 कोटी रुपये मूल्याच्या ऑर्डरमध्ये बीईएल कंपनीला प्रगत स्वदेशी डिझाइन आणि विकसित साइटसह अग्निशामक नियंत्रण प्रणालीचे काम देण्यात आले आहे. यासह कंपनीला भारतीय लष्करासाठी 2/2 बीएमपी टँक अपग्रेड करण्याचे काम देण्यात आले आहे.

चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत आतापर्यंत बीईएल कंपनीला एकूण 48003 कोटी रुपये मूल्याच्या ऑर्डर्स मिळाल्या आहेत. ब्रोकरेज फर्म CLSA ने बीईएल स्टॉकवर ‘बाय’ रेटिंग देऊन गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला होता. मात्र लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर तज्ञांनी या स्टॉकवर आउटपरफॉर्म रेटिंग जाहीर केली आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्सचे मूल्यांकन महाग झाले आहे. अनेक ब्रोकरेज फर्मने बीईएल स्टॉकची प्राइस टार्गेट 400 रुपये निश्चित केली आहे.

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीला 2024-25 या चालू आर्थिक वर्षात 25000 कोटी रुपये मूल्याच्या ऑर्डर मिळण्याची अपेक्षा आहे. भारत सरकारने संरक्षण कंपन्यांना अनेक पार्टसच्या आयातीवर कस्टम ड्युटीतून सूट दिली आहे. पुढील 5 वर्षांत भारतातून संरक्षण उत्पादनांची निर्यात 50000 कोटी रुपयेपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | BEL Share Price NSE Live 01 July 2024.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

BEL Share Price(109)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या