
BEL Share Price | बीईएल म्हणजेच भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स मजबूत तेजीत वाढत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 8.54 टक्क्यांच्या वाढीसह 280 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील हा स्टॉक मोठ्या प्रमाणात खरेदी केला जात आहे. ( भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनी अंश )
ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवालने बीईएल स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. या कंपनीच्या शेअर्सचा इतिहास भरघोस कमाई करून देण्याचा आहे.
तज्ञांच्या मते हा स्टॉक पुढील काळात हा स्टॉक 310 रुपये किमतीवर जाऊ शकतो. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड ही कंपनी 1954 पासून व्यवसाय करत आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 189213.62 कोटी रुपये आहे. आज बुधवार दिनांक 22 मे 2024 रोजी बीईएल स्टॉक 2.75 टक्के वाढीसह 281.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीने नुकताच आपले मार्च तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. कंपनीचे उत्पन्न मागील वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत 103.01 टक्के वाढीसह 8789.51 कोटी रुपये नोंदवले गेले आहे.
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीमध्ये भारत सरकारने 51.14 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. तर परकीय संस्थागत गुंतवणूकदारांनी या कंपनीचे 17.56 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. देशांतर्गत संस्थागत गुंतवणूकदारांनी या कंपनीचे 22.63 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. बीईएल ही कंपनी मुख्यतः संरक्षण क्षेत्राशी संबंधित उत्पादने आणि उपकरणे बनवण्याचा व्यवसाय करते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.