
BEL Share Price | बीईएल म्हणजेच भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. नुकताच बीईएल कंपनीला आर्मर्ड व्हेइकल्स निगम लिमिटेड कंपनीकडून 3172 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर मिळाली आहे. शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स इंट्रा-डे ट्रेडमध्ये 1.77 टक्क्यांच्या वाढीसह 309.90 रुपये किमतीवर पोहचले होते. दिवसाअखेर प्रॉफिट बुकींगमुळे बीईएल स्टॉक किंचित खाली आला होता. शुक्रवार दिनांक 28 जून 2024 रोजी बीईएल स्टॉक 1.59 टक्के वाढीसह 309.35 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. ( भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनी अंश )
भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीला आर्मर्ड व्हेइकल्स कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीकडून 3172 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर मिळाली आहे. या ऑर्डर अंतर्गत कंपनीला भारतीय लष्कराच्या BMP 2/2K रणगाड्यांमध्ये सुधारणा करण्याचे, आणि स्वदेशी प्रगत दृष्टी आणि अग्निशामक यंत्रणा स्थापित करण्याचे काम देण्यात आले आहे. याशिवाय बीईएल कंपनीला डॉपलर वेदर रडार, क्लासरूम जॅमर्स, स्पेअर्स आणि सेवा इत्यादींची निर्मिती करण्याचे 481 कोटी रुपये मूल्याचे काम देण्यात आले आहे.
आर्थिक वर्ष 2024-2025 मध्ये बीईएल कंपनीला 4803 कोटी रुपये मूल्याच्या ऑर्डर मिळाल्या आहेत. बीईएल कंपनीला संपूर्ण आर्थिक वर्ष 2024-2025 मध्ये 25 हजार कोटी रुपये मूल्याची ऑर्डर मिळणे अपेक्षित आहे. ब्रोकरेज फर्म CLSA ने बीईएल स्टॉक खरेदी करण्याची शिफारस केली आहे.
मागील वर्षी 30 जून 2023 रोजी बीईएल स्टॉक 120.60 रुपये या आपल्या वार्षिक नीचांक किमतीवर पोहचले होते. या किमतीवरून हा स्टॉक अवघ्या 11 महिन्यांत 168 टक्क्यांनी वाढला आहे. 3 जून 2024 रोजी बीईएल कंपनीच्या शेअर्सनी 323 रुपये ही उच्चांक किंमत स्पर्श केली होती. सध्या हा स्टॉक आपल्या उच्चांक किमतींवरून 5 टक्क्यांनी खाली आला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.