 
						BEL Share Price | डिफेन्स क्षेत्रातील शेअर्समध्ये चांगली तेजी दिसून (SGX Nifty) आली आहे. संरक्षण खरेदी परिषदेने (DAC) २१७७२ कोटी रुपयांच्या संरक्षणाशी संबंधित पाच योजनांना अधिकृत मंजुरी दिल्यानंतर संरक्षण क्षेत्रातील शेअर्स (Gift Nifty Live) तेजीत आहेत. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडचा शेअर येत्या तीन ते चार मोठा उच्चांक गाठेल असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस ब्रोकरेज फर्मने महत्वाचा सल्ला दिला आहे. (भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनी अंश)
शेअरबाबत तज्ज्ञांचे मत
मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड ब्रोकरेज फर्मच्या तज्ज्ञांनी यांनी सांगितले की, ‘भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार तेजीचे संकेत दिसत आहे. साप्ताहिक स्तरावर भारत इलेक्ट्रॉनिक्स शेअरने १२ आठवड्यांनंतर चांगली व्हॉल्यूम वाढ करून रेंज ब्रेकआऊट दिला आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्स शेअरचा मोमेंटम ऑसिलेटर तेजीचा क्रॉसओव्हर देत आहे असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.
शेअर्स उच्चांकी पातळी गाठणार
मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड ब्रोकरेज फर्मच्या तज्ज्ञांनी पुढे सांगितले की, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीच्या शेअरने एकंदर पीएसयू स्पेसमध्ये सापेक्ष आउटपरफॉर्मन्स दर्शविला आहे, शेअरची सध्याची तांत्रिक सेटअप लक्षात घेता, मोतीलाल ओसवाल फायनान्शियलने 340 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. तसेच 293 रुपयांचा स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला देखील दिला आहे.
भारत इलेक्ट्रॉनिक्स शेअरची सध्याची स्थिती
गुरुवार 05 डिसेंबर 2024 रोजी भारत इलेक्ट्रॉनिक्स शेअर 0.58 टक्के घसरून 311.05 रुपयांवर पोहोचला होता. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनी शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 340.50 रुपये होता, तर शेअरचा 52 आठवड्यांचा निच्चांकी स्तर 149.95 रुपये होता. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप 2,27,224 कोटी रुपये आहे.
भारत इलेक्ट्रॉनिक्स शेअरने 1,41,286 टक्के परतावा दिला
गुरुवार 05 डिसेंबर 2024 पासून मागील ५ दिवसात भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनी शेअरने 0.61% परतावा दिला आहे. मागील १ महिन्यात या शेअरने 8.63% परतावा दिला आहे. मागील ६ महिन्यात भारत इलेक्ट्रॉनिक्स शेअरने 19.47% परतावा दिला आहे. मागील १ वर्षात भारत इलेक्ट्रॉनिक्स शेअरने 104.64% परतावा दिला आहे. YTD आधारावर या शेअरने 68.18% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात भारत इलेक्ट्रॉनिक्स शेअरने 808.97% परतावा दिला आहे. मात्र लॉन्ग टर्म मध्ये भारत इलेक्ट्रॉनिक्स शेअरने 141,286.36% परतावा दिला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		