 
						Bharat Dynamics Share Price | मागील एका वर्षभरात संरक्षण कंपन्यांच्या शेअर्सनी जबरदस्त कामगिरी केली आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड आणि भारत डायनॅमिक या दोन्ही कंपन्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. आज या लेखात आपण या दोन्ही कंपन्याच्या कामगिरीचा आढावा घेणार आहोत. भारतीय संरक्षण क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांनी मागील काही वर्षात मोठ्या प्रमाणात ऑर्डर्स मिळवल्या आहेत. या कंपन्यांनी देखील व्यवसायात कमालीची कामगिरी केली आहे.
1) हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड :
मागील गेल्या एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 63 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 36 टक्क्यांपेक्षा जास्त नफा मिळवून दिला आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1,37,781 कोटी रुपये आहे. आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये या कंपनीने 26,927.46 कोटी रुपये महसूल संकलित केले होता.
वार्षिक आधारावर कंपनीने महसूल संकलनात 9.3 टक्के वाढ नोंदवली आहे. मागील आर्थिक वर्षात हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीने 5079.88 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. आज गुरूवार दिनांक 16 नोव्हेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.39 टक्के वाढीसह 2,120 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2) भारत डायनॅमिक्स लिमिटेड :
एचएएल कंपनीच्या तुलनेत भारत डायनॅमिक्स कंपनीच्या शेअरने फारशी चांगली कामगिरी केलेली नाही. मात्र या कंपनीने आपल्या दीर्घकालीन गुंतवणूकदारांना मजबूत कमाई करून दिली आहे. मागील 5 वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 283 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात हा कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 17 टक्क्यांपेक्षा जास्त नफा कमावून दिला आहे.
चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत या कंपनीने 615.81 कोटी रुपये महसूल महसूल संकलित केले होता. वार्षिक आधारावर कंपनीच्या महसूल संकलनात 15.14 टक्के वाढ झाली आहे. तर निव्वळ नफ्यात कंपनीने वार्षिक आधारावर 94 टक्के वाढ नोंदवली आहे. आज गुरूवार दिनांक 16 नोव्हेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.59 टक्के वाढीसह 1,107.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		