
BHEL Share Price | मंगळवार 29 ऑक्टोबर रोजी भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनी शेअर 0.44 टक्के वाढून 230.75 रुपयांवर (NSE: BHEL) पोहोचला होता. सोमवारी इंट्राडे ट्रेडिंगमध्ये भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनी शेअरमध्ये १० टक्क्यांपर्यंत वाढ झाली आणि त्यांनतर ६ टक्क्यांच्या तेजीसह बंद झाला होता. (भेल लिमिटेड कंपनी अंश)
दुसऱ्या तिमाहीचे निकाल
भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनीला दुसऱ्या तिमाहीत १०६.१५ कोटी रुपये निव्वळ नफा झाला आहे. भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनीला प्रामुख्याने महसुलात झालेल्या वाढीचा फायदा झाला आहे. भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनीला गेल्या वर्षी याच तिमाहीत ६३.०१ कोटी रुपयांचा निव्वळ तोटा झाला होता. भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनीने याबाबत स्टॉक मार्केटला माहिती दिली आहे. दुसऱ्या तिमाहीत भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनीचे एकूण उत्पन्न वाढून 6,695.37 कोटी रुपये झाले आहे, जे मागील वर्षी याच तिमाहीत 5,305.38 कोटी रुपये होते.
तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला
भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनी शेअरबाबत तज्ज्ञांनी महत्वाचा सल्ला दिला आहे. अनेक ब्रोकरेज फर्मने भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनी शेअर्स कव्हरेज केलं आहे. सीएलएसए ब्रोकरेज फर्मने त्यांच्या नोटमध्ये नकारात्मक संकेत दिले आहेत. सीएलएसए ब्रोकरेज फर्मने पुढे असेही म्हटले आहे की, ‘भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनी शेअरबाबत नकारात्मक संकेत दिसत आहेत, परंतु आर्थिक वर्ष 2026 च्या प्राईस-टू-अर्निंगच्या 40 पट दराने हा शेअर “खूप जास्त किंमतीवर” आहे.
शेअर टार्गेट प्राईस
सीएलएसए ब्रोकरेज फर्मने या शेअरला ‘अंडरपरफॉर्म’ रेटिंग दिली आहे. तसेच या शेअरसाठी १८९ रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. एकूण १७ विश्लेषकांपैकी १० विश्लेषकांनी या शेअरला ‘सेल’ रेटिंग दिली आहे. तसेच ७० ते ३६४ रुपये टार्गेट प्राईस दिली आहे.
शेअरने मल्टिबॅगर परतावा दिला
मागील ६ महिन्यात हा शेअर 16.67% घसरला आहे. मागील १ वर्षात या शेअरने 91.18% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात या शेअरने 305.54% परतावा दिला आहे. तर YTD आधारावर या शेअरने 16.45% परतावा दिला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.