
BHEL Share Price | बीएचईएल म्हणजेच भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड या सरकारी कंपनीचे शेअर्स शुक्रवारी 3 टक्के वाढीसह 285 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मात्र हा स्टॉक लाल निशाणीवर क्लोज झाला आहे. नुकताच या कंपनीला अदानी समूहाकडून मोठी ऑर्डर मिळाली आहे. ( भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनी अंश )
बीएचईएल कंपनीला रायपूर छत्तीसगड येथे थर्मल पॉवर प्लांट उभारण्यासाठी अदानी पॉवर लिमिटेड कंपनीने 3,500 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर दिली आहे. या ऑर्डर अंतर्गत क्रिटिकल टेक्नॉलॉजीवर आधारित 800-800 मेगावॅट क्षमतेच्या दोन वीज प्रकल्पांसाठी उपकरणे, बॉयलर, टर्बाइन, जनरेटर, पुरवठा आणि स्थापनेचे काम देण्यात आले आहे.
आज सोमवार दिनांक 10 जून 2024 रोजी बीएचईएल स्टॉक 0.25 टक्के घसरणीसह 284.80 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. बीएचईएल कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, अदानी पॉवर कंपनीच्या ऑर्डरची पूर्तता करण्यासाठी लागणारे बॉयलर आणि टर्बाइन जनरेटर त्रिची आणि हरिद्वार येथील प्लांटमध्ये तयार केले जातील.
शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, बीएचईएल स्टॉक अल्पावधीत 315 रुपये ते 320 रुपये किमतीवर जाऊ शकतो. मार्च 2024 तिमाहीत बीएचईएल कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा 25 टक्क्यांच्या घसरणीसह 489.6 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत बीएचईएल कंपनीने 658.02 कोटी रुपये एकत्रित निव्वळ नफा कमावला होता.
मार्च 2024 तिमाहीत बीएचईएल कंपनीचा एकूण खर्च वाढून 7,794.11 कोटी रुपये नोंदवला गेला होता. मागील वर्षीच्या याच तिमाही कालावधीत कंपनीचा खर्च 7,411.64 कोटी रुपये नोंदवला गेला होता. या कालावधीत कंपनीचे एकूण उत्पन्न वार्षिक आधारावर 8,338.61 कोटी रुपयेवरून वाढून 8,416.84 कोटी रुपयेवर पोहचले होते.
बीएचईएल कंपनीने आर्थिक वर्ष 2023-24 साठी आपल्या गुंतवणूकदारांना 25 पैसे प्रति शेअर या दराने अंतिम लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. बीएचईएल कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये 282.22 कोटी रुपये नोंदवला गेला होता. मागील आर्थिक वर्षात या कंपनीने 654.12 कोटी रुपये नफा कमावला होता. 2023-24 मध्ये बीएचईएल कंपनीने 23,853.57 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. तर मागील वर्षी 24,439.05 कोटी रुपये नोंदवला गेला होता.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.