
BHEL Share Price | बीएचईएल या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. ब्रोकरेज फर्म ICICI सिक्युरिटीजच्या तज्ञांनी बीएचईएल कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते या सरकारी कंपनीचे शेअर्स आणखी वाढू शकतात. तज्ञांच्या मते, बीएचईएल स्टॉक पुढील काळात 300 रुपये किंमत स्पर्श करू शकतो.
तज्ञांच्या मते बीएचईएल स्टॉक पुढील काळात आपल्या गुंतवणुकदारांना 50 टक्के अधिक परतावा कमावून देऊ शकतो. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बीएचईएल कंपनीचे शेअर्स 202.90 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज बुधवार दिनांक 17 जानेवारी 2024 रोजी बीएचईएल स्टॉक 3.89 टक्के वाढीसह 210.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
आर्थिक वर्ष 2024 मध्ये बीएचईएल कंपनीच्या ऑर्डर बुकचा आकार 65,000 कोटी रुपयेपेक्षा जास्त होण्याची शक्यता आहे. ICICI सिक्युरिटीज फर्मने आपल्या अहवालात माहिती दिली की, बीएचईएल कंपनीचे ग्रॉस मार्जिन पुढील काही वर्षांत 300 बेसिस पॉइंट्सने वाढण्याची शक्यता आहे. ICICI सिक्युरिटीज फर्मच्या तज्ञांनी बीएचईएल कंपनीचे शेअर्स 300 रुपये टार्गेट प्राइससाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.
अँटिक स्टॉक ब्रोकिंग फर्मच्या तज्ञांनी बीएचईएल स्टॉकवर 230 रुपये टार्गेट प्राइस निश्चित केली होती. आता अनेक तज्ञांनी या स्टॉकवर आपली टार्गेट प्राइस वाढवली आहे. बीएचईएल स्टॉकचे निरक्षण करणाऱ्या 18 तज्ञापैकी पाच जणांनी स्टॉक खरेदी करण्याची शिफारस केली आहे. मात्र 12 जणांनी या कंपनीचे शेअर्स विकण्याचा सल्ला दिला आहे. मागील एका वर्षात बीएचईएल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 164 टक्के नफा कमावून दिला आहे. तर मागील सहा महिन्यात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 126 टक्के वाढली आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.