
BHEL Share Price | बीएचईएल म्हणजेच भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. सोमवारच्या व्यवहारात या कंपनीचे शेअर्स 283.40 रुपये किमतीवर पोहोचले होते. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 254 टक्के परतावा कमावून दिला आहे. ( भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनी अंश )
मागील दोन वर्षांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 42.7 टक्के वाढली आहे. आज मंगळवार दिनांक 30 एप्रिल 2024 रोजी भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 0.25 टक्के वाढीसह 277.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
28 एप्रिल 2022 रोजी भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 53.8 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 29 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 77.20 रुपये किमतीवर पोहचले होते. शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, सध्या बीएचईएल स्टॉकमध्ये 255-250 रुपये किमतीच्या दरम्यान मजबूत सपोर्ट पाहायला मिळत आहे. शेअर बाजारातील तज्ञांनी बीएचईएल स्टॉक 282 रुपये टार्गेट प्राइससाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.
बीएचईएल कंपनीच्या ऑर्डर बुकचा आकार सकारात्मक असल्याने शेअर्समध्ये अपट्रेंड सुरू राहण्याची अपेक्षा आहे. अल्पावधीत हा स्टॉक 325-330 रुपये किंमत स्पर्श करू शकतो. LKP सिक्युरिटीज फर्मच्या तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स 285 रुपये किमतीवर जाऊ शकतात. त्यानंतर हा स्टॉक 300 रुपये किंमत स्पर्श करू शकतो. बीएचईएल कंपनीच्या ऑर्डर बुकचा आकार 2 लाख कोटी रुपये आहे. बीएचईएल ही कंपनी भारतातील सर्वात मोठी अभियांत्रिकी उत्पादन कंपनी म्हणून ओळखली जाते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.