 
						BHEL Share Price | BHEL म्हणजेच भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड या सरकारी कंपनीने मागील वर्षी आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या स्टॉकमध्ये प्रचंड चढ-उतार पाहायला मिळत होती. बुधवारी स्टॉकमध्ये प्रॉफिट बुकींग पाहायला मिळत होती.
मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये भेल कंपनीचे शेअर 3 टक्क्यांच्या वाढीसह 143.55 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. बुधवार दिनांक 6 सप्टेंबर 2023 रोजी भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 2.06 टक्के घसरणीसह 135.55 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. काल गुरुवार दिनांक 7 सप्टेंबर 2023 रोजी BHEL शेअर्स 1.73 टक्के वाढीसह 137.90 रुपये (NSE सकाळी 9:30 वाजता) किमतीवर ट्रेड करत होते. आज शुक्रवार दिनांक ८ सप्टेंबर 2023 रोजी भारत हेवी इलेक्ट्रिकल्स कंपनीचे शेअर्स 1.82 टक्के वाढीसह (सकाळी ०९:३० वाजता) 140.20 रुपयांवर ट्रेड करत आहेत.
भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनी सोमवारी एका निवेदनात म्हंटले होते की, कंपनीने भारतातील सर्वात मोठ्या 2,880 MW क्षमतेच्या जलविद्युत प्रकल्पाची ऑर्डर जिंकली आहे. भेल कंपनीला अरुणाचल प्रदेश राज्यातील दिबांग व्हॅलीमध्ये रोईंग याठिकाणी 12×240 MW क्षमतेचा वीज निर्मिती प्रकल्प उभारण्याची ऑर्डर NHPC कडून देण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक उपकरणे भोपाळ, बेंगळुरू, झाशी आणि रुद्रपूर येथील उत्पादन केंद्रात तयार केले जाणार आहे. आणि कोलकातामधील युनिटच्या मदतीने प्रत्यक्ष स्थानावर कामकाज सुरू केले जाणार आहे.
ब्रोकरेज प्रभुदास लिल्लाधरच्या तज्ञांनी आपल्या अहवालात म्हंटले आहे की, आम्ही ऑर्डरचे सविस्तर तपशील जाहीर होण्याची प्रतीक्षा करत आहोत. या प्रकल्पाची मुदत 9-10 वर्षे असण्याची शक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे. थर्मल पॉवर ऑर्डरमध्ये वाढ झाल्याने आणि भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनीने रेल्वे, संरक्षण, आण्विक, हायड्रो यांसारख्या विभागावर अधिक लक्ष केंद्रित केल्याने कंपनीच्या दीर्घकालीन कामगिरीत सुधारणा पाहायला मिळू शकते.
जेएम फायनान्शियल फर्मच्या तज्ञांनी भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनीच्या शेअरवर ‘बाय’ रेटिंग देऊन स्टॉक 165 रुपये लक्ष्य किंमतीसाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने मागील आठ ट्रेडिंग सेशनमध्ये आपल्या गुंतवणुकदारांना 36 टक्के परतावा कमावून दिला आहे. 2023 या वर्षात हा स्टॉक 75.36 टक्के वाढला आहे.
मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरची किंमत 132 टक्के वाढली आहे. आणि केंद्र सरकारने या कंपनीचे बहुसंख्य भाग भांडवल धारण केले आहे. जून 2023 च्या मध्ये भारत सरकारची भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनीमध्ये 63.17 टक्के मालकी होती.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		