27 July 2024 11:02 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | सरकारी योजनेत फायदाच फायदा! 95 रुपयांच्या बचतीवर मिळतील 14 लाख रुपये, संधी सोडू नका Reliance Power Share Price | कर्जमुक्त कंपनी रिलायन्स पॉवरचा शेअर 'पॉवर' दाखवणार, 29 रुपयांचा शेअर खरेदीला गर्दी Smart Investment | पैशाने पैसा बनवतो हा फॉर्म्युला, वयाच्या 40 आधीच स्वतःचा आलिशान फ्लॅट खरेदी करू शकाल OTT Most Watch Film | OTT वर सर्वाधिक पाहिले जात आहेत हे हिंदी चित्रपट, थ्रिलर सिनेमा टॉप ट्रेंडमध्ये Upcoming Movies | 15 ऑगस्टला बॉक्स ऑफिस धमाका; या चार सिनेमांची चित्रपटगृहात होणारं थेट भेट Bonus Share News | कमाईची संधी सोडू नका! ही कंपनी फ्री शेअर्स देणार, शॉर्ट टर्म मध्ये पैसा वाढवा HFCL Share Price | 5G संबंधित HFCL सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा
x

Bikaji Foods International Share Price | पैसाच पैसा! शेअरने अल्पावधीत 25% परतावा, 5 दिवस अप्पर सर्किटमध्ये, बक्कळ पैसा देणारा स्टॉक

Bikaji Foods International Share Price

Bikaji Foods International Share Price | मागील पाच दिवसांत बिकाजी फूड्स इंटरनॅशनल कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार खरेदी झाली आहे. या कंपनीचे शेअर्स मागील काही दिवसांपासून सतत अप्पर सर्किटवर ट्रेड करत आहेत. शुक्रवार दिनांक 30 डिसेंबर 2022 रोजी बिकाजी फूड्स इंटरनॅशनल कंपनीचे शेअर्स 5 टक्के अप्पर सर्किटवर क्लोज झाले होते. बीएसई इंडेक्सवर सुरुवातीच्या काही तासातील ट्रेडिंगमध्ये शेअर्स 437.90 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील पाच ट्रेडिंग सेशनमध्ये बिकाजी फूड्स कंपनीच्या शेअर्सनी लोकांना 25 टक्के परतावा कमावून दिला आहे. बिकाजी फूड्स कंपनीचे शेअर्स नोव्हेंबर 2022 मध्ये बाजारात सूचीबद्ध झाले होते. हा स्टॉक सूचीबद्ध झाल्यानंतर 36 टक्के वाढला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Bikaji Foods International Share Price | Bikaji Foods International Stock Price | BSE 543653 | NSE BIKAJI)

बिकाजी फूड्स इंटरनॅशनल कंपनीने डिसेंबर 2022 महिन्यात हनुमान अॅग्रोफूड प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे अधिग्रहण पूर्ण केले. 7 नोव्हेंबर 2022 रोजी या शेवटच्या दिवसापर्यंत बिकाजी फूड्स इंटरनॅशनल कंपनीचा IPO 26.67 पट अधिक सबस्क्राइब झाला होता. या कंपनीच्या IPO चा आकार 881 कोटी रुपये होता, आणि IPO मध्ये 2,06,36,790 शेअर्सवर 55,04,00,900 शेअर्सची बोली प्राप्त झाली होती. बिकाजी फूड्स कंपनीच्या प्रवर्तक आणि विद्यमान भागधारकांनी आपल्या IPO मध्ये 2.93 कोटी शेअर्स OFS अंतर्गत खुल्या बाजारात विक्रीसाठी जारी केले होते. IPO जारी करण्यापूर्वी बिकाजी फूड्स कंपनीने अँकर गुंतवणूकदारांकडून 262 कोटी रुपये भांडवल उभारणी केली होती.

कंपनीबद्दल थोडक्यात माहिती :
1986 साली स्थापन झालेली बिकाजी फूड्स इंटरनॅशनल लिमिटेड भारतात स्नॅक्स आणि मिठाई बनवणारी कंपनी म्हणून प्रसिद्ध आहे. बिकाजी फूड्स आंतरराष्ट्रीय उपस्थिती असलेली भारतातील सर्वात मोठी स्नॅक्स कंपनी आहे. बिकाजी फूड्स इंटरनॅशनल कंपनीचे संस्थापक शिवरतन अग्रवाल हे हल्दीराम कंपनीचे संस्थापक गंगाबिशन अग्रवाल यांचे नातू आहेत. बिकाजी फूड्स ही कंपनी मूलतः शिवदीप इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीचा भाग होती. 1993 मध्ये या कंपनीचे नाव बदलून बिकाजी फूड्स असे ठेवण्यात आले होते. Bikaji Foods कंपनीच्या प्रमुख उत्पादन पोर्टफोलिओमध्ये सहा प्रमुख वस्तूंचा समवेश होतो, त्यात भुजिया, नमकीन, पॅकबंद मिठाई, पापड, वेस्टर्न स्नॅक्स आणि इतर स्नॅक्स ज्यात प्रामुख्याने असोर्शन, फ्रोझन फूड, माथरी रेंज आणि कुकीज सामील आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Bikaji Foods International Share Price in focus 543653 BIKAJI check details on 31 December 2022.

हॅशटॅग्स

Money Making Shares(8)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x