3 May 2025 3:48 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL Yes Bank Share Price | येस बँक शेअर्सबाबत अलर्ट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, अपडेट नोट करा - NSE: YESBANK RVNL Share Price | मल्टिबॅगर आरव्हीएनएल शेअरबाबत फायद्याची अपडेट, एचडीएफसी सिक्योरिटीजने दिले संकेत - NSE: RVNL HAL Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल्स असलेला शेअर खरेदी करा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: HAL BEL Share Price | मल्टिबॅगर शेअर असावा तर असा, बिनधास्त खरेदी करून ठेवा, मजबूत परतावा मिळेल - NSE: BEL Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या
x

Bikaji Foods Share Price | बिकाजी फूड्स शेअरमध्ये मजबूत तेजी, नेमकं कारण काय? डिटेल वाचून गुंतवणुकीचा विचार करा

Bikaji Foods Share Price

Bikaji Foods Share Price | बिकाजी फूड्स इंटरनॅशनल लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये कमालीची तेजी पाहायला मिळत आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बिकाजी फूड्स इंटरनॅशनल या कंपनीचे शेअर्स पाच टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. नुकताच या कंपनीने आपले जून 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केल्याने गुंतवणूकदारांनी स्टॉक खरेदीला सुरुवात केली आहे. स्नॅक्स बनवणाऱ्या या कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त आर्थिक कामगिरीमुळे तेजी पाहायला मिळत आहे. (Bikaji Share Price)

बिकाजी फूड्स कंपनीने मागील वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत जून 2023 तिमाहीत 15 टक्क्यांच्या वाढीसह 481.68 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. एका वर्षापूर्वी जून 2022 तिमाहीत बिकाजी फूड्स इंटरनॅशनल कंपनीने 418.51 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. आज गुरूवार दिनांक 3 ऑगस्ट 2023 रोजी बिकाजी फूड्स इंटरनॅशनल कंपनीचे शेअर्स 1.45 टक्के वाढीसह 479.25 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

बिकाजी फूड्स इंटरनॅशनल कंपनीचे शेअर बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 5 टक्क्यांच्या वाढीसह 508.75 रुपये या आपल्या 52 आठवड्याच्या उच्चांक किंमत पातळीवर पोहचले होते. जून 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केल्यानंतर बिकाजी फूड्स इंटरनॅशनल कंपनीचे शेअर्स 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर पोहचले होते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 12,750 कोटी रुपये आहे.

मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर 484.10 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. बिकाजी फूड्स इंटरनॅशनल कंपनीचे शेअर्स मागील वर्षी नोव्हेंबर 2022 मध्ये शेअर बाजारात सूचीबद्ध कण्यात आले होते. IPO मध्ये या हा स्टॉक 300 रुपये किमतीवर वाटप करण्यात आला होता. या कंपनीच्या शेअर्सची किंमत IPO इश्यू किंमतीच्या तुलनेत 70 टक्क्यांनी वाढली आहे.

बिकाजी फूड्स इंटरनॅशनल ही कंपनी भारतातील तिसरी सर्वात मोठी पारंपरिक स्नॅक्स बनवणारी कंपनी मानली जाते. या कंपनीचे स्नॅक्स भारतीय बाजारात मोठ्या प्रमाणात खपतात. बिकाजी फूड्स इंटरनॅशनल ही कंपनी आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील व्यवसाय करते. तसेच ही कंपनी विविध प्रकारचे स्नॅक्स आणि मिठाई बनवण्याचे काम देखील करते. विविध स्नॅक्स व्यतिरिक्त बिकाजी फूड्स इंटरनॅशनल कंपनी पॅकेज रसगुल्ला, सोन पापडी आणि गुलाब जामुन सारखे पदार्थ विकण्याच्या बाबतीत देशात आघाडीवर आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Bikaji Foods Share Price today on 03 August 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Bikaji Foods Share price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या