27 July 2024 10:09 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | पैशाने पैसा बनवतो हा फॉर्म्युला, वयाच्या 40 आधीच स्वतःचा आलिशान फ्लॅट खरेदी करू शकाल OTT Most Watch Film | OTT वर सर्वाधिक पाहिले जात आहेत हे हिंदी चित्रपट, थ्रिलर सिनेमा टॉप ट्रेंडमध्ये Upcoming Movies | 15 ऑगस्टला बॉक्स ऑफिस धमाका; या चार सिनेमांची चित्रपटगृहात होणारं थेट भेट Bonus Share News | कमाईची संधी सोडू नका! ही कंपनी फ्री शेअर्स देणार, शॉर्ट टर्म मध्ये पैसा वाढवा HFCL Share Price | 5G संबंधित HFCL सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा HUDCO Share Price | मल्टिबॅगर शेअरसाठी BUY रेटिंग, कंपनीबाबत अपडेट आली, यापूर्वी 400% परतावा दिला IPO GMP | स्वस्त IPO आला रे! ग्रे मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिल्याच दिवशी मिळेल 100% परतावा
x

Hindenburg Report Adani Group | अदानी ग्रुपबाबत हिंडेनबर्गचा अहवाल 'अत्यंत विश्वासार्ह'!, दिग्गज अब्जाधीश विल्यम एकमन

Billionaire Investor William Ackman

Hindenburg Report Adani Group | अदानी समूहातील ‘हिंडेनबर्ग रिसर्च’ या शॉर्टसेलर कंपनीचा अहवाल अत्यंत विश्वासार्ह आणि अभ्यासपूर्ण संशोधनानंतर तयार करण्यात आल्याचे अब्जाधीश गुंतवणूकदार विल्यम एकमन यांनी म्हटले आहे. हिंडेनबर्गचा अहवाल समोर आल्यानंतर गेल्या दोन दिवसांत अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. शुक्रवारी अदानी समूहाचे शेअर्स २० टक्क्यांपर्यंत घसरले आहेत. गेल्या दोन दिवसांत अदानी समूहाच्या लिस्टेड कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये २.३७ लाख कोटी रुपयांची घट झाली आहे. समूहातील कंपन्यांचे मार्केट कॅप २४ जानेवारी रोजी १९.२० लाख कोटी रुपये होते, ते आता १६.८३ लाख कोटी रुपयांवर आले आहे.

हिंडेनबर्ग म्हणाले…
अमेरिकेचे अब्जाधीश विल्यम एकमन यांनी ट्विट मध्ये म्हटले आहे की, आम्ही अदानी समूहाच्या कोणत्याही कंपनीत किंवा हर्बल लाइफमध्ये दीर्घ किंवा शॉर्ट टर्म गुंतवणूक केलेली नाही. तसेच आम्ही स्वत:हून कोणतेही स्वतंत्र संशोधन केलेले नाही. हिंडेनबर्गने आपल्या अहवालात असेही म्हटले आहे की, त्यांनी अमेरिकन ट्रेडेड बाँड्स आणि नॉन-इंडियन ट्रेडेड डेरिव्हेटिव्ह इंस्ट्रुमेंट्सच्या माध्यमातून अदानी समूहात शॉर्ट पोझिशन घेतली आहे.

अदानी समूहाच्या कर्जामुळे बँकांना धोका नाही
दरम्यान, जागतिक ब्रोकिंग आणि रिसर्च फर्म सीएलएसएने म्हटले आहे की, अदानी समूहाच्या कर्जामुळे भारतीय बँकांना कोणताही नकारात्मक धोका आहे असे वाटत नाही. CLSA’चे म्हणणे आहे की अदानी समूहाच्या एकूण कर्जामध्ये देशांतर्गत सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील कर्जदारांचे एकूण एक्सपोजर मॅनेजेबल लिमिटेमध्ये आहे. सीएलएसएच्या विश्लेषकांच्या एका टीमने अदानी समूहातील पहिल्या पाच कंपन्यांचे (अदानी एंटरप्राइजेस, अदानी पोर्ट्स, अदानी पॉवर, अदानी ग्रीन एनर्जी आणि अदानी ट्रान्समिशन) एकत्रित कर्ज २.१ लाख कोटी रुपये मोजले आहे. जागतिक ब्रोकरेज हाऊस जेफरीजनेही अदानी समूहातील भारतीय बँकांचे गुंतवणूक व्यवस्थापनीय मर्यादेत असल्याचे म्हटले आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Billionaire Investor William Ackman on Adani Group Hindenburg Report check details on 29 January 2023.

हॅशटॅग्स

#Billionaire Investor William Ackman(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x