
BL Kashyap Share Price | बीएल कश्यप अँड सन्स लिमिटेड या स्मॉल कॅप कंपनीचे शेअर्स मजबूत तेजीत वाढत आहेत. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 6 टक्के वाढीसह 54.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज शुक्रवारी देखील या कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत तेजी पहायला मिळत आहे.
बीएल कश्यप अँड सन्स लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, नुकताच हा कंपनीला एक मोठी ऑर्डर मिळाली आहे. आज शुक्रवार दिनांक 22 सप्टेंबर 2023 रोजी बीएल कश्यप अँड सन्स कंपनीचे शेअर्स 2.26 टक्के वाढीसह 54.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
गुंतवणुकीवर परतावा
मागील एका वर्षात बीएल कश्यप अँड सन्स लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 119.35 टक्के नफा कमावून दिला आहे. तर YTD आधारे या कंपनीचे शेअर्स 69.52 टक्के वाढले आहेत. मागील सहा महिन्यांत बीएल कश्यप अँड सन्स लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 69 टक्के परतावा कमावून दिला आहे. जून 2023 तिमाहीमध्ये बीएल कश्यप अँड सन्स कंपनीचा महसूल 11.6 टक्के वाढला आहे.
ऑर्डरचा तपशील
नुकताच बीएल कश्यप अँड सन्स कंपनीने माहिती दिली होती की, कंपनीला 167 कोटी रुपये मूल्याची एक ऑर्डर मिळाली आहे. या कॉन्ट्रॅक्टमध्ये दिल्ली विमानतळा संबंधित काम करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. बीएल कश्यप अँड सन्स कंपनीच्या सेबी फाइलिंगनुसार कंपनीला मिळालेल्या ऑर्डरचे एकूण मूल्य 167 कोटी रुपये आहे.
हा कॉन्ट्रॅक्ट गेटवे डिस्ट्रिक्ट, एरोसिटी, IGI विमानतळ, दिल्ली इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड संबंधित आहे. या कामाची पूर्तता करण्यासाठी कंपनीला 18 महिन्याची मुदत देण्यात आली आहे. सध्या या कंपनीच्या ऑर्डर बुकचा आकार 3005 कोटी रुपये आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.