 
						BLB Share Price | शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बीएलबी लिमिटेड कंपनीचे शेअर्स 11.19 टक्क्यांच्या वाढीसह 24.85 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र त्यानंतर स्टॉकमध्ये जोरदार नफा वसुली सुरू झाली, आणि शेअर्सची किंमत किंचित घसरली. मात्र आज या कंपनीच्या शेअर्समध्ये सर्वात मोठा अप्पर सर्किट लागला होता.
बीएलबी लिमिटेड कंपनीचे एकूण बाजार भांडवल 131 कोटी रुपये आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 32.85 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 18.01 रुपये होती. आज शनिवार दिनांक 20 जानेवारी 2024 रोजी बीएलबी लिमिटेड कंपनीचे शेअर्स 19.96 टक्के वाढीसह 32.15 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
मागील 5 दिवसात बीएलबी लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 8 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 32 टक्के परतावा कमावून दिला आहे. या काळात कंपनीच्या शेअर्सची किंमत 18.45 रुपयेवरून 24.80 रुपयेवर गेली होती.
17 एप्रिल 2020 रोजी बीएलबी लिमिटेड कंपनीचे शेअर्स 3.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या किंमत पातळीवरून हा स्टॉक 700 टक्क्यांनी मजबूत झाला.आहे. बीएलबी लिमिटेड ही कंपनी मुख्यतः मार्केट स्ट्रक्चर आणि डायनॅमिक्स ट्रॅकिंगशी संबंधित व्यवसायात गुंतलेली आहे.
बीएलबी लिमिटेड ही कंपनी राष्ट्रीय शेअर बाजार म्हणजेच NSE ची कॉर्पोरेट सदस्य कंपनी आहे. बीएलबी ग्रुपची स्थापना 1965 साली झाली होती. ही कंपनी चार दशकांहून अधिक काळ कॉर्पोरेट स्टॉक ब्रोकर म्हणून व्यवसाय करत आहे. बीएलबी लिमिटेड ही कंपनी विविध ब्रोकरेज फर्मला आपल्या टीममध्ये सामील करून लाखो ग्राहकांना सेवा प्रदान करण्याचा व्यवसाय करते. सध्या जर तुम्ही शेअर बाजारात सट्टेबाजी करून कमाई करु इच्छित असाल तर तुम्ही बीएलबी लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये पैसे लावू शकता.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		