 
						Bondada Engineering Share Price | बोंदाडा इंजिनिअरिंग कंपनीला हिंदुजा उद्योग समूहाकडून एक मोठी ऑर्डर प्राप्त झाली आहे. बोंदाडा इंजिनिअरिंग कंपनीने सेबी माहितीत कळवले आहे की, हिंदुजा रिन्युएबल्स एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून 9,54,03,000 रुपये मूल्याची नवीन ऑर्डर प्राप्त झाली आहे.
या ऑर्डर अंतर्गत बोंदाडा इंजिनिअरिंग कंपनीला तमिळनाडू राज्यात शिवगंगई येथे 16.5 मेगावॅट क्षमतेचा प्रकल्प, सेवा, बांधकाम, चाचणी आणि कार्यान्वित करण्या संबधित काम देण्यात आले आहे. बोंदाडा इंजिनिअरिंग कंपनीला हे ऑर्डर पुढील 4 महिन्यांत पूर्ण करायचे आहे. शुक्रवार दिनांक 7 ऑक्टोबर 2023 रोजी बोंदाडा इंजिनिअरिंग कंपनीचे शेअर्स 1.52 टक्के वाढीसह 180.00 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बोंदाडा इंजिनिअरिंग कंपनीचे शेअर्स मजबूत तेजीत ट्रेड करत होते. गुरुवारी बोंदाडा इंजिनिअरिंग स्टॉक 0.60 टक्क्यांच्या वाढीसह 177.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. बोंदाडा इंजिनिअरिंग कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांकी किंमत पातळी 142.50 रुपये होती. बोंदाडा इंजिनिअरिंग कंपनीचे शेअर्स BSE SME इंडेक्सवर सूचीबद्ध करण्यात आले होते.
कंपनीने आपल्या IPO मध्ये एका लॉट अंतर्गत 1,600 शेअर्स जारी केले होते. बोंदाडा इंजिनिअरिंग कंपनीचा IPO ऑगस्ट 2023 मध्ये शेअर बाजारात लाँच करण्यात आला होता. आणि कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची किंमत बँड 75 रुपये निश्चित केली होती. या किमतीच्या तुलनेत स्टॉक आता 133.33 टक्के मजबूत झाला आहे.
आर्थिक वर्ष 2022 च्या तुलनेत 2023 मध्ये बोंदाडा इंजिनिअरिंग कंपनीची निव्वळ विक्री 11 टक्क्यांच्या वाढीसह 371 कोटी रुपये नोंदवली गेली आहे. या काळात कंपनीचा निव्वळ नफा 80 टक्क्यांच्या वाढीसह 18 कोटी रुपये नोंदवला गेला आहे.
बोंदाडा इंजिनिअरिंग कंपनीच्या शेअर्सचा ROE 26.1 टक्के आणि ROCE 22.3 टक्के आहे. बोंदाडा इंजिनिअरिंग ही कंपनी मुख्यतः दूरसंचार आणि सौर ऊर्जा उद्योगांमध्ये कार्यरत असणाऱ्या कंपन्यांना अभियांत्रिकी, खरेदी आणि बांधकाम सेवा आणि ऑपरेशन्स, देखभाल सेवा प्रदान करण्याचा व्यवसाय करते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		