
Bonus Share News | अल्गोक्वांट फिनटेक लिमिटेड या फिनटेक कंपनीने पहिल्यांदाच फ्री बोनस शेअर्स देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अल्गोक्वांट फिनटेक कंपनी शेअर फोकसमध्ये आला आहे. विशेष म्हणजे या कंपनीच्या शेअरने मागील ५ वर्षात गुंतवणूकदारांना 20,689 टक्के परतावा दिला आहे. कंपनीने 8 जानेवारी 2025 ही रेकॉर्ड तारीख जाहीर केली आहे.
कोणाला मिळणार फ्री शेअर्स
अल्गोक्वांट फिनटेक लिमिटेड कंपनीने 8 जानेवारी 2025 ही रेकॉर्ड तारीख जाहीर केली आहे. म्हणजे 8 जानेवारी 2025 पर्यंत ज्या गुंतवणूकदारांच्या डिमॅट खात्यात अल्गोक्वांट फिनटेक कंपनीचे शेअर्स असतील त्यांच्या खात्यात फ्री बोनस शेअर्स जमा होतील. पात्र गुंतवणूकदारांना २ रुपये फेस व्हॅल्यू असलेल्या २ शेअर्सवर एक शेअर बोनस दिला जाईल. शेअर बाजारात अल्गोक्वांट फिनटेक कंपनी 8 जानेवारी 2025 रोजी एक्स-बोनस स्टॉक म्हणून ट्रेड करणार आहे.
कंपनीचा स्टॉक स्प्लिट करण्यात आला होता
अल्गोक्वांट फिनटेक लिमिटेड कंपनी स्टॉक स्प्लिट करण्यात आला होता. २०२१ मध्ये अल्गोक्वांट फिनटेक कंपनीच्या शेअर्सचा एक्स-स्प्लिट स्टॉक म्हणून ट्रेड झाला होता. त्यानंतर अल्गोक्वांट फिनटेक लिमिटेड कंपनीचे शेअर्स ५ भागांमध्ये विभागले गेले होते. त्यानंतर 10 रुपये अंकित मूल्य असलेल्या अल्गोक्वांट फिनटेक शेअरची फेस व्हॅल्यू 2 रुपये प्रति शेअर करण्यात आली होती. मात्र अल्गोक्वांट फिनटेक कंपनीने अद्याप गुंतवणूकदारांना डिव्हीडंड दिलेला नाही.
अल्गोक्वांट फिनटेक शेअरची सध्याची स्थिती
सोमवार, 30 डिसेंबर 2024 रोजी अल्गोक्वांट फिनटेक शेअर 0.42 टक्क्यांनी वाढून 1370 रुपयांवर पोहोचला होता. अल्गोक्वांट फिनटेक कंपनी शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 1,619.80 रुपये होता, तर शेअरचा 52 आठवड्यांचा नीचांकी स्तर 972.10 रुपये होता. अल्गोक्वांट फिनटेक कंपनीचे एकूण मार्केट कॅप सध्या 2013 कोटी रुपये आहे.
शेअरने गुंतवणूकदारांना 20,689 टक्के परतावा दिला
मागील १ वर्षात अल्गोक्वांट फिनटेक शेअरने 23.51% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात शेअरने 20,689.07% परतावा दिला आहे. तसेच लॉन्ग टर्ममध्ये या शेअरने 11,579.45% परतावा दिला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.